कर्जत प्रतिनिधी – गणेश जेवरे
अंबालिका कारखाना सुरू……
अंबालिका साखर कारखाना या वर्षी शेतकऱ्यांना दोन हजार आठशे रुपये प्रति क्विंटल दर देणार असल्याच आज जाहीर करण्यात आले.
कर्जत तालुक्यातील शेतकऱ्यांची कामधेनू असणाऱ्या श्री अंबालिका शुगर प्रा ली या साखर कारखान्याच्या या वर्षीच्या गळीत हंगामास आज विषयी विजयादशमीच्या मुहूर्तावर शुभारंभ करण्यात आला.

यावेळी कारखान्याची मुख्य संचालन अधिकारी जेएन वाघ मुख्य कार्यकारी अधिकारी एस एम तावरे,जनरल मॅनेजर एस बी शिंदे,मुख्य शेतकी अधिकारी ओ बी भोसले,सुहास गलांडे,बाळासाहेब शिंदे,करमाळा तालुक्यातील जि प सदस्य सविता राजे भोसले,सुहास गलांडे,नवनाथ झोळ,तानाजी झोळ,श्याम कानगुडे, रावसाहेब लोंढे यांच्यासह अनेक मान्यवर ऊस उत्पादक शेतकरी वाहतूकदार व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना मुख्य कार्यकारी अधिकारी एस एम तावरे म्हणाले की,मागील वर्षी अंबालिका शुगर या कारखान्याने सर्व शेतकरी यांच्या मदतीने सोळा लाख मेट्रिक टन उसाचे गळीत केले व 17 लाख मेट्रिक टन साखर उत्पादन केले शेतकऱ्यांना दोन हजार पाचशे तेरा रुपये भाव दिला यामध्ये एफ आर पी सी 2570 असा एकूण दर देण्यात आला आहे.आगामी वर्षांमध्ये मात्र कारखाना प्रति टन दोन हजार 800 रुपये भाव ऊस उत्पादकांना देणार आहे असे श्री तावरे यांनी यावेळी जाहीर केले.
तसेच कारखाना परिसरातील शाळा,कॉलेज, येथील विद्यार्थी,कामगार, परिसरातील नागरिक,वाड्या वस्तीवरील नागरिक, यांच्यासाठी कारखाना मालकीची सुपर मार्केट हे दुकान सुरू करण्यात आले आहे.यामुळे परिसरातील सर्वांना कमी दरामध्ये सर्व वस्तू या ठिकाणी सहज उपलब्ध होणार आहेत.याशिवाय आगामी काळामध्ये शेतकऱ्यांचे ऊस उत्पादन वाढावे यासाठी ठिबक चांगले ऊस बियाणे व तज्ञ लोकांचे मार्गदर्शन शेतकऱ्यांना कारखान्याच्या वतीने करण्यात येणार आहे असे श्री तावरे म्हणाले.
यावेळी करमाळा तालुक्यातील शेतकरी ऊस उत्पादकांच्या वतीने सुहास गलांडे व कर्जत तालुक्यातील शेतकर्यांच्या वतीने एडवोकेट बाळासाहेब शिंदे यांनी मनोगत व्यक्त करताना अंबालिका शुगर या कारखान्यामुळे शेतकऱ्यांना होत असलेला फायदा वया कारखान्याची गरज व आजपर्यंत या कारखान्यांनी केलेली वाटचाल याबाबत सविस्तर मत मांडले.
सर्व उपस्थितांचे आभार जनरल मॅनेजर एस बी शिंदे यांनी मानले.