अंबेवाडी ग्रामस्थांच्या वतीने वैद्यकीय अधिकारी डॉ.परमेश्वर बडेंचा गुणगौरव

0
93

अंमळनेर प्रतिनिधी –

अंमळनेर आरोग्य केंद्रा अंतर्गत येणाऱ्या अंबेवाडी येथे कोवीड प्रतिबंधक लसीकरणाचा टक्का वाढण्यासाठी अंमळनेर आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. परमेश्वर बडे यांनी अथक परिश्रम घेतले होते यामुळे अंबेवाडी येथे जवळपास 95 टक्के लसीकरण झाल्यामुळे अंबेवाडी ग्रामस्थांनी अंमळनेर आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. परमेश्वर बडे यांचा जंगी सत्कार समारंभ कार्यक्रम उत्साहात साजरा केला.यावेळी लसीकरणा साठी महत्त्वाची कामगिरी बजावत असलेले सुपरवायझर सदगर ,आरोग्य सेविका अश्विनी ढाकणे ,सुपरवायझर गायके यांचा देखील ग्रामस्थांनी सत्कार केला.

अंमळनेर आरोग्य केंद्राचा कारभार हे वैद्यकीय अधिकारी डॉ. परमेश्वर बडे हे पहात आहेत त्यांनी अंबेवाडी येथे लसीकरण मोहीम गतिमान केल्यामुळे अंबेवाडीत लसीकरणाचा टक्का देखील वाढला आहे .

अंबेवाडी येथे मंगळवारी कोवीड प्रतिबंधक लसीकरणाचे औचित्य साधून व उत्कृष्ट कर्तव्य बजावून अंबेवाडीत लसीकरणाचा टक्का वाढवल्याबद्दल अंमळनेर आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. परमेश्वर बडे यांच्या सह आरोग्य कर्मचारी सदगर ,आरोग्य सेविका अश्विनी ढाकणे ,सुपरवायझर गायके यांचा अंबेवाडी ग्रामस्थांच्या वतीने अंबेवाडी येथील ग्रामस्थ दादा पवार ,बबन पवार ,सुदाम मोरे ,लक्ष्मण सरोदे यांनी सत्कार समारंभ करुन गुणगौरव केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here