एपीआय शामकुमार डोंगरे यांची कारकीर्द राहिली अविस्मरणीय .
अंमळनेर प्रतिनिधी – पोलीस ठाण्याचे तत्कालीन ठाणे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक शामकुमार डोंगरे यांची बीडला बदली झाल्यानंतर अंमळनेरचे बिनविरोध लोकप्रिय सरपंच उध्दवशेठ पवार यांच्या सह शिष्टमंडळाने बीडला जाऊन अंमळनेर पोलीस ठाण्याचे तत्कालीन एपीआय शामकुमार डोंगरे यांची भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली.
अंमळनेर पोलीस ठाणे हद्दीत असणाऱ्या ५९ गावात तत्कालीन एपीआय शामकुमार डोंगरे यांनी कायदा सुव्यवस्था उत्कृष्ट संभाळून जनतेचे व पोलिसांचे जिव्हाळ्याचे संबंध निर्माण झाले होते यामुळे कधीच कायदा सुव्यवस्था बाधित होण्याचा प्रश्न निर्माण झाला नाही.
अंमळनेर पोलीस ठाणे हद्दीतील बहुतांश नागरीक हे बीडला गेल्यानंतर एपीआय शामकुमार डोंगरे यांची भेट घेऊन त्यांच्या शी संवाद साधत आहेत अंमळनेर पोलीस ठाण्याला प्रथमच एपीआय शामकुमार डोंगरे यांच्या रुपाने एक कर्तव्य दक्ष आणी चाणाक्ष एपीआय लाभले होते.
अंमळनेरचे बिनविरोध लोकप्रिय सरपंच उध्दवशेठ पवार ,मा.उपसरपंच सुरेश पवार ,कोतनचे सरपंच महेश खेंगरे ,आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक आशोक पवार ,सह संजय घोशिर ,पिंटु आपरे ,आबासाहेब पवार ,शिवाजी घोशिर ,यांचे शिष्टमंडळ नुकतेत तत्कालीन अंमळनेर पोलीस ठाण्याचे एपीआय शामकुमार डोंगरे यांना बीडला भेटले यावेळी या शिष्टमंडळाने विविध विषयांवर चर्चा केली.