अंमळनेर प्रतिनिधी –
अंमळनेर आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. परमेश्वर बडे यांचे चोख नियोजन असल्यामुळे अंमळनेर आरोग्य केंद्रात लसीकरणासाठी नागीकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे .
अंमळनेर आरोग्य केंद्रात मंगळवारी लसीकरणासाठी आलेल्या नागीकांची आरटीपीसीआर अॅन्टीजन टेस्ट केल्यानंतर त्यांना लस देण्यात येत होती अंमळनेर आरोग्य केंद्रात १११ आरटीपीसीआर करण्यात आला तर ५५२ नागीकांच्या अॅन्टीजन टेस्ट करण्यात आल्या यात दोन व्यक्ती पॉझिटिव्ह तर ३१७ व्यक्तींना लस देण्यात येऊन ओपीडीत ११ रुग्णांची देखील तपासणी करण्यात आलेली असल्याची माहिती अंमळनेर आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. परमेश्वर बडे यांनी दिली.
अंमळनेर आरोग्य केंद्राच्या वतीने उपकेंद्रा च्या ठिकाणी देखील लसीकरणाची सोय उपलब्ध करण्यात येत असल्यामुळे अंमळनेर आरोग्य केंद्रात लस घेण्यासाठी होणारी गर्दी यामुळे कमी झालेली आहे .
अंमळनेर आरोग्य केंद्रा अंतर्गत येणाऱ्या गाव खेड्यातील नागरीकांनी जर लस घेतली नसेल तर त्यांनी लस घ्यावी सध्या लस पुरेशी येत असल्यामुळे लसी पासुन कोणी वंचित राहण्याचा प्रश्न नाही परंतु नागरीकांनी आपली व आपल्या जनतेच्या हितासाठी निसंकोच पणे लस घेण्याचे आवाहन अंमळनेर आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. परमेश्वर बडे यांनी केले आहे.