अंमळनेर पोलीस ठाण्याला मिळाल्या सहा नव्या कोऱ्या दुचाकी

0
96

पंधरा ऑगस्ट पासुन बिट अंमलदारांची दुचाकीवर पेट्रोलींग

अंमळनेर पोलीस ठाण्याला मिळाल्या सहा नव्या कोऱ्या दुचाकी .

अंमळनेर ( प्रतिनिधी ) येत्या पंधरा ऑगस्ट पासुन पाटोदा तालुक्यातील अंमळनेर पोलीस ठाण्यातील बिट अंमलदार हे दुचाकीवर पेट्रोलींग करतांना दिसुन येणार असुन यासाठी नुकत्याच अंमळनेर पोलीस ठाण्याला नव्या कोऱ्या सहा दुचाकी उपलब्ध झालेल्या असल्याची माहिती अंमळनेर पोलीस ठाण्याचे कर्तव्य दक्ष ठाणे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक शामकुमार डोंगरे व पीएसआय नंदकुमार ठोंबरे यांनी दिली.

अंमळनेर पोलीस ठाण्यातील बिट अंमलदार यांना बिट मध्ये फिरण्यासाठी नव्या कोऱ्या दुचाकी उपलब्ध झालेल्या आहेत पंधरा ऑगस्ट रोजी या दुचाकीवर बिट अंमलदार हे पेट्रोलींग करतांना दिसुन येणार आहेत.

अंमळनेर पोलीस ठाण्याला बिट अंमलदार यांना फिरण्यासाठी देण्यात येणाऱ्या दुचाकींना जीपीएस सुध्दा बसवण्यात आलेली आहे यामुळे बिट अंमलदार हे बिट मध्ये कुठे फिरतात याचे अचुन लोकेशन देखील ठाणे प्रमुखांना मिळणार आहे.

बिट अंमलदार यांना देण्यात येणाऱ्या नव्या कोऱ्या दुचाकीमुळे बिट मध्ये घडणाऱ्या घटनास्थळी बिट अंमलदार यांना जाणे सोपे व सोईस्कर होणार असुन बिट अंमलदार दररोज बिट मध्ये या दुचाकीमुळे फिरतांना दिसुन येणार आहेत .

अंमळनेर पोलिस ठाण्याला उपलब्ध झालेल्या दुचाकीचा पेट्रोल सर्विसिंग खर्च देखील सरकारी दप्तरीमधुन होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here