अखेर मांडवगण येथील ग्रामसेवकांच्या ‘डेथ बॉडीचा’शोध लागला

0
148

अंमळनेर प्रतिनिधी – सुनिल आढाव

अहमदनगर जिल्ह्यातील मांडवगण येथील ग्रामसेवक झुंबर मुरलीधर गवांडे यांनी २४ सप्टेंबर वार शुक्रवार रोजी पाच ते सहाच्या सुमारास पाटोदा तालुक्यातील सौताडा येथील दरीत आत्महत्या केली.परंतु शुक्रवारी या घटनेला आठ दिवस झाले होते.त्यांची डेथ बॉडी शनिवार दोन ऑक्टोबर रोजी मिळून आलेली आहे .

श्रीगोंदा तालुक्यातील मांडवगण येथील रहिवाशी असलेले आत्महत्या केलेले ग्रामसेवक गवांदे हे मांडवगण जवळच असणाऱ्या खांडगाव येथेच कार्यरत होते.त्यांनी पाटोदा तालुक्यातील सौताडा येथील दरीत येऊन आत्महत्या कशामुळे केली ? कि कोणाच्या जाचास कंटाळून केली ? कि त्यांना कोणी आत्महत्या करण्यास भाग पाडले या सर्व बाबी तपासून या प्रकरणाचा बारकाईने तपास हा पाटोदा पोलीस ठाण्याचे पीआय मनिष पाटील करत आहेत.

मांडवगण येथील ग्रामसेवक गवांदे यांचे प्रेत हे शनिवारी सापडले सौताडा येथील दरी मोठ्या प्रमाणात खोल आहे. त्यातच पाऊस देखील पडून गेलेला असल्यामुळे पाण्याचा प्रवाह देखील वाढला आहे.यामुळे ग्रामसेवकांची डेथ बॉडी सापडणार कि नाही असा प्रश्न निर्माण झाला होता.परंतु श्रीगोंदा तालुक्यातील मांडवगण येथील ग्रामसेवक गवांदे यांनी सौताडा दरीत आत्महत्या करुन आठ दिवस लोटल्यानंतर त्यांची डेथ बॉडी सापडली आहे.

ग्रामसेवकांची डेथ बॉडी पाण्यावर तरंगत असल्याची माहिती पाटोदा पोलीस ठाण्याचे पीआय मनिष पाटील यांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली.पोलीस कर्मचारी बाळु सानप,सुनिल सोनवणे,गुरसाळे, टेकाळे,डोके,बळिराम काथखडे,मिसाळ,नागरगोजे यांनी देखील घटनास्थळी भेट दिलेली होती .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here