अडीच वर्षाचा कोव्हीड कालावधी सोडला तर मतदार संघातील प्रत्येक माणसाच्या हितासाठी आपण काम करीत राहीलो – खा. डॉ. सुजय विखे पाटील

- Advertisement -

अडीच वर्षाचा कोव्हीड कालावधी सोडला तर मतदार संघातील प्रत्येक माणसाच्या हितासाठी आपण काम करीत राहीलो – खा. डॉ. सुजय विखे पाटील

पाथर्डी (प्रतिनिधी)

मागील पाच वर्षाच्या काळात जिल्ह्यातील विविध प्रश्न सोडविण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला.विविध मंत्रालयाच्या माध्यमातून निधीची उपलब्धता करून विकास कामांना गती दिली.अडीच वर्षाचा कोव्हीड कालावधी सोडला तर मतदार संघातील प्रत्येक माणसाच्या हितासाठी आपण काम करीत राहीलो.जनतेसाठी केलेल्या कामाचे पाठबळ निश्चित मिळेल असा विश्वास महायुतीचे उमेदवार खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी केला.पाथर्डी तालुक्याच्या दौऱ्यातील संवाद सभेत बोलत होते.

महायुतीचे उमेदवार खासदार सुजय विखे पाटील यांच्या प्रचारार्थ पाथर्डी तालुक्यात ठिकठिकाणी संवाद सभांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी खासदार डॉ. विखे यांच्यासह जिल्हा बॅंकेचे चेअरमन शिवाजीराव कर्डीले, आमदार मोनिकाताई राजळे, दिनकरराव पालवे, एकनाथ हटकर, विजय गवळे, साहेबराव गोळे, महादेव कुटे, तसेच भाजपाचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.

या वेळी बोलताना सुजय विखे पाटील म्हणाले की, मागील पाच वर्षात मी जिल्ह्यातील विविध प्रश्नांची उकल केली असून रस्ते, पाणी, उद्योग विकास, पर्यटन, महिला सक्षमीकरण, शेतकऱ्यांचे, कामगारांचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी केंद्र तथा राज्य शासनाच्या माध्यमातून प्रयत्न केले आहेत. जिल्ह्यातील गावागावात विकासकामांसाठी निधीची पुर्तता केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या विविध लोककल्याणकारी योजना जिल्ह्यातील प्रत्येक लाभार्थ्यांपर्यंत पोहचविल्या आहेत. बचत गटांच्या माध्यमातून महिलांना स्वयंरोजगार निर्मितीसाठी काम केले आहे.मला जिल्ह्याच्या विकासासाठी काय करावे लागणार याची जाण आहे.

येणाऱ्या काळात जिल्ह्याच्या विकासासाठी पायाभूत सुविधा निर्माण करणे, तरूणांच्या हाताला काम देणे, शिक्षणासाठी सुविधा उभ्या करणे, अत्याधुनिक आरोग्य सुविधा निर्माण, पाण्याचा प्रश्न मार्गी लावणे अशी विविध कामे करण्याचा आपला मानस त्यांनी व्यक्त केला. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर आपला गाढा विश्वास असून नगरकरांच्या हितासाठी त्यांच्या माध्यमातून विविध विकासकामे केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

शिवाजीराव कर्डीले यांनी सुद्धा यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित केले. त्यांनी खासदार यांच्या कार्याचा गौरव करत, वांभोरी चाळीतील पाणी प्रश्न सोडविण्यासाठी केलेल्या कामाचा उल्लेख केला. तसेच येणाऱ्या काळात खासदार सुजय विखे पाटील यांच्या प्रयत्नाने वांभोरी चाळीच्या पाईपलाईनच्या नुतनिकरणाचा प्रश्न मार्गी लावला जाईल असे त्यांनी सांगितले.

तर आमदार मोनिकाताई राजळे यांनी मतदारांना आवाहन करताना सांगितले की, डॉ. सुजय विखे पाटील यांनी मागील पाच वर्षात दिलेल्या कामांची आश्वासने पुर्ण केली आहेत. त्यांनी दिलेला शब्द पाळला असून येणाऱ्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून जिल्ह्याचे प्रश्न सोडविण्यासाठी डॉ. सुजय विखे पाटील हे सत्तेत असणे आवश्यक आहेत. यामुळे येत्या १३ मे ला नगर जिल्ह्यातील एक सुशिक्षित आणि सामान्य नागरिकांची कळकळ असलेला खासदार आपल्याला पाठवायचा आहे. यामुळे कमळाचे बटन दाबून त्यांना भरगोस मतांनी विजयी करा असे त्यांनी सांगितले.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles

error: Content is protected !!