अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या कार्यालयात संभाजी महाराज जयंती साजरी
संभाजी महाराजांच्या प्रेरणेने युवकांना अडचणी व समस्यांना सक्षमपणे तोंड देता येणार -प्रकाश थोरात
अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या कार्यालयात छत्रपती संभाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली. सामाजिक कार्यकर्ते प्रकाश थोरात व संदीप पवार यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेत पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापक प्रणिता बोराडे, वसंतराव नाईक, विकास महामंडळाचे प्र. व्यवस्थापक दत्तू सांगळे, महात्मा फुले विकास महामंडळाचे राजू त्रिभुवन, नितीन साळवे, संतोष ससाणे, संजना साठे, राजेश पवार, गौरव रंधवे, चंद्रकांत शिंदे, धीरज रासकर, अमोल राऊत, सिताराम वैराळ, विनोद भांबळ आदींसह लेखा अधिकारी व सर्व कर्मचारी वृंद उपस्थित होते.
प्रकाश थोरात म्हणाले की, छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि छत्रपती संभाजी महाराज यांनी आपल्या आठ-नऊ वर्षांच्या कार्यकाळात एकूण 120 युद्धे लढली. महाराजांनी सर्वच्या सर्व युध्दात विजय मिळवला. असा पराक्रम करणारे संभाजी महाराज हे एकमेव योध्दे होते. छत्रपती संभाजी महाराजांच्या इतिहासातून युवकांनी प्रेरणा घेतली पाहिजे, युवकांनी त्यांचा आदर्श समोर ठेवल्यास येणाऱ्या अडचणी व समस्यांना सक्षमपणे तोंड देता येणार असल्याचे त्यांनी सांगितले.