अध्यात्माने मन प्रफुल्लित होवून सकारात्मकता येते : पोपटराव पवार

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

केडगाव साई मंदिरातील साई सच्चरित्र ग्रंथ पारायण सोहळ्याची सांगता

अहमदनगर प्रतिनिधी – विक्रम लोखंडे

पावसामुळे श्रावण महिना हा आनंदाचा महिना असतो. स्वर्गातील सर्व देवदेवता या काळात आशीर्वाद देण्यासाठी येतात. सर्व महत्त्वाचे सण उत्सव या काळात असतात. यातून एकत्र येणे, महाप्रसाद, सप्ताहाचे कार्यक्रम होत असतात. नोकरी, व्यवसायानिमित्त आपण गाव सोडून इतरत्र स्थायिक होतो. अशा नवीन ठिकाणी मंदिराची उभारणी करून आपण पुन्हा एकत्र येण्याचा आनंद लुटतो. यातून आपले एक भावनिक नाते तयार होते. मानसिक समाधान जिथे मिळेल तिथे देवाचे अस्तित्व नक्कीच असते याची प्रचीती सगळ्यांनाच येते. भारतीय संस्कृतीने देवाचे स्वरुप निसर्गाशी जोडले आहे. अध्यात्माने मन प्रफुल्लित होते, नकारात्मकता निघून जाते, असे प्रतिपादन पद्मश्री पोपटराव पवार यांनी केले.

केडगाव येथील बँक कॉलनीतील श्री साईबाबा फौंडेशनच्या साईबाबा मंदिराचा 9 वा वर्धापन दिन नुकताच साजरा झाला. यानिमित्त 16 ऑगस्ट पर्यंत साई सच्चरित्र ग्रंथ पारायण सोहळ्याचे आयोजन होते. सोहळ्याची सांगता पोपटराव पवार यांच्या हस्ते मध्यान्ह आरती व महाप्रसादाने झाली. तत्पूर्वी साईकथाकार माधुरीताई शिंदे यांचे प्रवचन झाले.

या कार्यक्रमास समाजसेवक भापकर गुरुजी, फौंडेशनचे अध्यक्ष अजित कातोरे, उपाध्यक्ष सुनील कुलकर्णी, अशोक झिने, अजितसिंग दाढीयाल, अशोक जाधव, कावेरी जाधव, प्रकाश वाघ,डॉ.मुकुंद शेवंगावकर, संगिता कातोरे, नगरसेवक अमोल येवले ,नगरसेवक संग्राम कोतकर, नगरसेवक विजय पठारे, अभिजित कोतकर, संदीप जाधव, प्रशांत गारकर, संतोष हुलगे, संजय बोरगे, विठ्ठल कोतकर, बबलू कोतकर, युवराज कोतकर, बलभिम कर्डिले, बाबासाहेब वायकर, जयद्रथ खाकाळ, दडियाल भाभी आदी उपस्थित होते. आदी उपस्थित होते.

अखेरच्या दिवशी साईंची धुपारती बाळासाहेब सातपुते यांच्या हस्ते झाली. शेजारती वेळी परिसरातील साईभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. वर्धापन दिनानिमित्त फौंडेशनच्यावतीने भव्य रक्तदान शिबिरही आयोजित केले होते. या शिबिराला साईभक्तांचा मोठा प्रतिसाद मिळाला.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -
- Advertisement -

Latest Articles

error: Content is protected !!