अध्यात्मिकतेतून धर्म, विचार, वारसा आपल्या कुटुंबांना मिळत असतो – आमदार संग्राम जगताप

बागडपट्टी शेरकर गल्ली येथे मराठा समाज पंचाचे तालीम पंचमंडळ व हनुमान मंदिर ट्रस्ट यांच्या वतीने श्री हनुमान व गणपती प्राणप्रतिष्ठापना आ. संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न

अध्यात्मिकतेतून धर्म, विचार, वारसा आपल्या कुटुंबांना मिळत असतो – आमदार संग्राम जगताप

नगर : आपल्या भागातील मंदिरे हे आध्यात्मिक व धार्मिकतेचे संस्कार केंद्रे असून भाविकांचे श्रद्धास्थान असते पुरातन मंदिरांच्या उभारणीसाठी लोकसहभागाची खरी गरज असते. आमच्या जगताप कुटुंबियांला अध्यात्मिकतेचा वारसा लाभलेला आहे तो पुढे घेऊन जाण्याचे काम आम्ही सर्वजण करत आहोत.
अध्यात्मिकतेतून धर्म, विचार, वारसा आपल्या कुटुंबांना मिळत असतो. त्यातून संस्कृत पिढी घडत असते या माध्यमातून सकारात्मक ऊर्जा मिळत असते, त्यातून आपल्याला नवचैतन्य मिळते आपण सर्वजण मिळून धार्मिकतेचे कार्य असेच पुढे  घेऊन जाऊ मराठा समाज पंच मंडळाचे 100 वर्षापासून सुरू असलेले धार्मिकतेचे कार्य कौतुकास्पद असून त्यांनी श्री हनुमान व गणपती मंदिराची नव्याने उभारणी केली असल्याचे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.
बागडपट्टी शेरकर गल्ली येथे मराठा समाज पंचाचे तालीम पंचमंडळ व हनुमान मंदिर ट्रस्ट यांच्या वतीने श्री हनुमान व गणपती प्राणप्रतिष्ठापना आ. संग्राम जगताप यांच्या हस्ते झाली, यावेळी अध्यक्ष शंकर दगडे, उपाध्यक्ष रामदास शेरकर, मनोज कर्डिले, चंद्रकांत बोरुडे, कर्नल यशवंत मिसाळ, सुधांशू मिसाळ, शिवाजी शिंदे, दीपक बिडवे, कैलास कर्डिले, रामदास शेरकर, दत्तात्रय बोली, शांताराम बिडवे, सुनील भागवत, योगेश भागवत, गौरव कांबळे, संजय कांबळे, राजू कांबळे, अजय ढोणे, पिंटू ढोणे आदी उपस्थित होते,
- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles

error: Content is protected !!