अनामप्रेमच्या अन्न सुरक्षा योजनेतून दिव्यांग यांना घरपोहच किराणा किटचे वितरण

0
90

अहमदनगर प्रतिनिधी – अनामप्रेम संस्थेच्या माध्यमातून नगर जिल्ह्यातील विविध गावांमधून अंथरुणाला खिळून असणाऱ्या,बेरोजगार,असहाय्य दिव्यांग यांचे सर्वेक्षण करण्यात आले.लॉकडाऊन काळापासून नगर तालुक्यात अनामप्रेमच्या वतीने सातत्याने सर्वेक्षण करून मदत दिली जाते.

या एप्रिल महिन्यापासून नगर तालुक्यातील धनगरवाडी, बहिरवाडी,उदरमल,आव्हाडवाडी,पांगरमल, मांजरसूबा डोंगरगण,देवगाव,रतडगाव,सारोळाबद्दी,पिंपळगाव लांडगा,मेहकरी,पिंपळगाव माळवी,बारदरी,भातोडी पारगाव या गावात सर्वेक्षण करण्यात आले.

या गावातील अंथरुणाला खिळून असणारे अपंग,बेसहारा अपंग यांना अनामप्रेमने महिना भर पुरेल इतका किराणा किट दिले.अनामप्रेम ने अन्न सुरक्षा योजना सुरू केली असून या योजनेतून प्रत्येक महिन्याला पुरेल इतका किराणा किट अनामप्रेम घरपोहच देत आहे. अशा प्रकारचे किराणा किट मिळाल्याने जे दिव्यांग रोजगार अथवा एस.टी. संप यामुळे आर्थिक संकटात आहेत त्यांना दिलासा मिळाला आहे.

अनामप्रेम संस्थेचे संचालक जे.आर. मंत्री,समन्वयक विक्रम प्रभू यांनी या अन्न सुरक्षा योजनेचे सर्वेक्षण करून गरजू लाभार्थी यांना घरपोहच किराणा किट मदत दिली आहे. सत्यप्रकाश बढे,अक्षय राऊत,रोहित लाटणे,रिता प्रभू यांनी या संपूर्ण योजनेची रूपरेखा आखली आहे.

प्रत्येक महिन्याला १०० गरजू अपंग जे झोपून आहेत, अशा लाभार्थी यांना किराणा किट अनामप्रेम मार्फत पुरवण्याचा अनामप्रेम संस्थेचा संकल्प आहे. दानशूर नगरकर,दात्यांनी किरणा किट मधील अंगाचे साबण, कपड्याचे साबण, खाद्यतेल,शेंगदाणे,बेसनपीठ,मसाले आदी यांचा सहयोग द्यावा, असे आवाहन अनामप्रेम संस्थेने केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here