अहमदनगर प्रतिनिधी – यंदाची दिवाळी सालाबादप्रमाणे अनामप्रेम च्या माध्यमातून अनेक दिव्यांग यांना किराणा किट व स्वर दीपावली कार्यक्रम याचे आयोजन करून गोड झाली.अतिवृष्टी,लॉक डाऊन,वाढती महागाई यामुळे बेरोजगार दिव्यांग यांचे जगणे मुश्किल झाले.यामुळे अनामप्रेम संस्थेने सर्व्हे करून ४१० दिव्यांग यांना किराणा किट वाटप केले.यामध्ये मराठवाडा,खान्देश,नगर जिल्हा यामधून गरजू दिव्यांग आले होते.

संगमनेर च्या नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे,युवा सामाजिक कार्यकर्त्या संध्या ताई सोनवणे,नोबल हॉस्पिटलचे संचालक डॉ.बापूसाहेब कांडेकर,स्नेहालय चे अध्यक्ष संजय गुगळे,उद्योजक जयकुमार मुनोत,अनामप्रेम चे अध्यक्ष अजित माने,सचिव दीपक बुरम यांच्या हस्ते हे किराणा किट वाटप करण्यात आले.
अनामप्रेम च्या संभाजी खिलारी,अमृत भुसारी, रामेश्वर फटांगडे यांच्या कमिटीने सर्व्हे करून सर्व प्रवर्गातील अपंग निवडले होते.अनामप्रेम चे डॉ.प्रकाश शेठ यांनी किराणा किट वाटप उपक्रमास प्रमुख सहयोग दिला.यामुळे ४०० दिव्यांग यांची दिवाळी अनामप्रेम गोड करू शकल्याची भावना कार्यकर्ते यांनी व्यक्त केली.
यंदा पहिल्यांदा प्रेमदान चौक येथील नोबल हॉस्पिटलमध्ये हा उपक्रम राबविण्यात आला.नोबल चे राहुल हिरे साहेब तसेच युनूस ऐंडे, श्रीनिवास राम यांनी हा उपक्रम संयोजनात प्रमुख सहभाग दिला.या सर्व दिव्यांग यांना नवी मुंबई येथील प्रयास फाऊंडेशन,पुणे येथील यश पेपर्स उद्योग समूह,नगर येथील परेश झंवर यांनी किट सहयोग दिला.
*स्वर दीपावली मुळे रसिक स्वरात न्हाले*
दरवर्षी अनामप्रेम द्वारा स्वर दीपावली हा कार्यक्रम अहमदनगर शहरात सादर केला जातो.यंदाचे वर्ष हे 7 वे वर्ष होते.प्रकाशगान संगीत रजनी मंच च्या माध्यमातून गरजू,होतकरू दिव्यांग यांना रोजगार मिळावा,व्यासपीठ मिळावे या हेतुने दिव्यांग हेच स्वर दीपावली हा उपक्रम चालवतात.यंदा महेश भागवत,सानिया यांच्या गायकीने कार्यक्रमात स्वरांची उधळण केली.निलेश पारखी यांच्या वादनाने उपस्थितांचे कान तृप्त झाले.
या कार्यक्रमास आर्कि.प्रफुल्ल सुराणा,उद्योजक राजेंद्र अकोलकर,नंदकुमार आढाव, अविनाश बोपेर्डीकर,राजू ढोरे, जे.के.मंत्री,नरेंद्र बोठे,अभय रायकवाड,विष्णू वारकरी आदी या कार्यक्रमास उपस्थित होते.
फेसबुक ऑनलाईन हा कार्यक्रम असल्याने अनामप्रेम च्या अनेक हितचिंतक देणगीदार यांनी ऑनलाइन हजेरी या कार्यक्रमास लावली.