अनुदानित खाजगी शाळेतील काही संस्थाचालकांची हप्तेखोरी थांबावी – शिक्षक आमदार नागो गाणार

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

कठोर शिक्षेची तरतूद असलेला शासन निर्णय निर्गमित करण्याची शिक्षक परिषदेची मागणी

अहमदनगर (प्रतिनिधी) – अनुदानित खाजगी शाळेतील काही संस्थाचालक शाळा चालविण्याचा नावाखाली कार्यरत शिक्षक, कर्मचार्‍यांकडून पैसे उकळीत आहे. संस्था चालक करीत असलेला हप्ता वसुलीचा प्रकार थांबण्यासाठी पैसे घेणार्‍या विरोधात कठोर शिक्षेची तरतूद असलेला शासन निर्णय निर्गमित करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन शिक्षक परिषदेचे कार्याध्यक्ष तथा शिक्षक आमदार नागो गाणार यांनी शिक्षण आयुक्त व शिक्षण संचालकांना दिले असल्याची माहिती शिक्षक परिषदेचे नेते बाबासाहेब बोडखे यांनी दिली.

अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्‍यांकडून वेतनाच्या एक टक्का ते पाच टक्के पर्यंतचा निधी हप्त्याच्या स्वरूपात काही खाजगी शाळा संस्थाचालकांकडून वसूल केला जात असल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात प्राप्त होत आहे. अतिरिक्त शिक्षकाला रुजू करून घेणे, वरिष्ठ व निवड वेतन श्रेणी प्रस्ताव सादर करणे, सेवानिवृत्तीवेतन प्रकरण सादर करणे, भविष्य निर्वाह निधी खात्याशी संबंधित प्रकरणे सादर करणे, वेतनवाढ देणे तसेच शाळेचे बांधकाम, इमारत कर, विद्युत व पाणी बिल, विद्यार्थ्यांना शाळेत आणणे व घरपोच करण्याबाबतचा खर्च, शाळेतील भौतिक व्यवस्था करण्याकरिता लागणारा खर्च तसेच इतर आनुषंगिक खर्चाच्या नावाखाली शिक्षक कर्मचार्‍यांकडून आर्थिक वसुली करण्यात येते. शिक्षक कर्मचारी यांनी आर्थिक वसुलीत सहकार्य न केल्यास त्यांच्या आर्थिक नुकसान करणे, त्यांचा अपमान करणे त्यांना देय लाभापासून वंचित ठेवणे, हजेरीपटावर स्वाक्षरी करू न देणे, निलंबित व बडतर्फ करण्याची धमकी देण्याचे गैरकृत्य केले जात आहे. या सर्व गैर कृत्याला शाळेचे मुख्याध्यापक व लिपिक नाईलाजास्तव धाकापोटी सहकार्य करीत असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.शिक्षक व कर्मचार्‍यांकडून  पैसे उकळण्याचा प्रकार थांबण्यासाठी पैसे घेणार्‍या विरोधात कठोर शिक्षेची तरतूद असलेला शासन निर्णय निर्गमित करण्याची मागणी शिक्षक परिषदेने केली आहे.

या मागणीसाठी शिक्षक परिषदेचे राज्याध्यक्ष वेणुनाथ कडू, राज्य महिला आघाडी प्रमुख पुजाताई चौधरी, नरेंद्र वातकर, किरण भावठाणकर, माजी अध्यक्ष बाबासाहेब काळे, माजी आमदार भगवान अप्पा साळुंखे, सुमन हिरे, संजीवनीताई रायकर, प्रा.सुनिल पंडित, मुंबई विभाग अध्यक्ष उल्हास वडोदकर, कार्यवाह शिवनाथ दराडे आदी राज्य कार्यकारणी सदस्य प्रयत्नशील आहेत.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -
- Advertisement -

Latest Articles

error: Content is protected !!