हिंदी विभागातील विद्यार्थिनी सुवर्णा भगवान काळे ही महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) परिक्षा उत्तीर्ण करत पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदावर नियुक्त
अहमदनगर – सुवर्णा भगवान काळे,हिने महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) मार्फत 2020 मध्ये घेण्यात आलेल्या परिक्षेत यश मिळवत तिची निवड २०२३ मध्ये पोलीस उपनिरीक्षक (PSI) या पदावर झाली आहे.
सुवर्णाचा व्हाट्सअप्प चा DP व स्टेटस कायम 👩✈️ हा असायचा…’नशिबात नसलेल्या गोष्टी सुद्धा मिळवण्याची जिद्द ठेवत तीने तिचे स्वप्न खरं करून दाखवल. सुवर्णाचा जन्म एका सधन शेतकरी कुटुंबात झालेला.. परंतु नियतीला आणि त्या विधात्याला ते मान्य नव्हतं म्हणून तिच्या वाट्याला सतत संघर्ष आणि दुःख आलं इयत्ता दहावी मध्ये ती नापास होवुनही तिने जिद्द सोडली नाही.
मधल्या काळामध्ये तिच्या वरील वडिलांचे छत्र देखील हरपलं.त्यानंतर सुद्धा ती लढत राहिली.बहीनीचे लग्न,बाकी घरातील इतर जबाबदाऱ्या पार पाडत राहीली. दहावी (नवभारत विद्यालय ,देहरे) गणित विषयात नापास झालेली मुलगी हिंदी साहित्य विषयामध्ये (एम.ए. न्यू आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज ,अहमदनगर. येथुन) पुणे विद्यापीठात गोल्ड मेडल मिळवून पहिली येते. ही तिची जिद्द …
नंतर तिन बी.एड. केलं.कोरोणाच्या काळात तिच्या भावाचही छत्र हरपल..पण ती डगमगली नाही तिनं परिस्थितीशी झगडन सुरूच ठेवल.आईचा तिला आधार अन् पाठिंबा होताच अन् संस्कारही व जोडीला स्वतः तिची जिद्द.
काही समाजकंटकांनी तिला नावेही ठेवली. स्वतः शेतामध्ये आईला हातभार लावुन तर कधी अध्यापनाचे काम करून तिने आपला संघर्ष चालू ठेवला.आज ती जिंकलीय.. ते गेलेलं वैभव तीन पुन्हा मिळवले ..खरंच मुली सुद्धा सर्व काही मिळू शकतात.
शेतकऱ्यांची मुले, मुली कोणत्याही परिस्थितीमध्ये तक धरू शकतात हे तिने दाखवून दिले.. कारण त्यांच्यावर तसे संस्कार होतात. जिद्द तर त्यांना परिस्थिती पाहून जन्मापासूनच संस्कारातून मिळत गेलेली असते. तेच संस्कार त्यांचे चरित्र बनवतात आणि व्यक्तिमत्व घडवतात…हे चरित्र सांभाळता येण्याची ताकद, संयम, कुटुंबातील मिळालेल्या अन् घेतलेल्या संस्कारातुच मिळते.काहींना आजच्या युगामध्ये ते शक्य होत नाही..
खरंच सुवर्णा तुझी जिद्द,चिकाटी व कष्टाला सलाम….
मिडिया डेली न्यूज परिवाराकडून तुझे अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा….