अनेक महिन्यापासून रस्त्यावर मैला मिश्रित पाणी वाहत असल्यामुळे नगरसेवक झाले आक्रमक

0
93

व्यवसायिकांचे मनपाला निवेदन

 

अहमदनगर प्रतिनिधी – पाईपलाईन रोडवरील यशोदा नगर जवळ रस्त्यावर गेल्या अनेक महिन्यापासून मैला मिश्रित पाणी वाहत असून रहदारी साठी अडचण झाली असून व्यावसायिकांना देखील हे त्रासदायक ठरत आहे.

2 दिवसां पासून पाईपलाईन रोडचे डांबरीकरण काम सुरू आहे अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून हे रस्ते तयार करण्यात येत आहेत हे पाणी रस्त्यावर आले तर चांगले काम खराब दिसेल तरी मनपाने तातडीने बंद गटार पाईपलाईन टाकून हे सांडपाणी वाहून नेण्यासाठी काम सुरू करावे अशी मागणी आयुक्त शंकर गोरे यांना येथील व्यावसायिकांनी नगरसेवक सुनील त्रंबके,निखिल वारे, विनीत पाउलबुद्धे, बाळासाहेब पवार यांच्या समवेत भेट घेऊन केली आहे.

महानगरपालिकेने 2 दिवसात यशोदा नगर जवळ वाहत असलेल्या या मैला मिश्रित पाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी तातडीने उपाययोजना करावी अन्यथा आम्ही चारही नगरसेवक आयुक्तांच्या दालनात उपोषण सुरू करू असा इशारा निखिल वारे यांनी दिला आहे.

नगरसेवक आक्रमक झाल्याने नागरिक आता गप्प बसणार नाही मुख्य रस्ते डांबरीकरण होण्या पूर्वी ड्रेनेज काम सुरू करावे अशी मागणी यशोदा नगर येथील व्यावसायिक उमेश डोईफोडे, अमोल लोणकर, अभिजीत कांबळे, महेश ठोर्जे आदींनी निवेदनात केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here