भिंगारची वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात यावा
अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन करू – शहर उपाध्यक्ष संकेत व्यवहारे यांचा इशारा
नगर – भिंगार पोलीस स्टेशन हद्दीतील भिंगार नाला ते विजय नगर चौक येथे रोज सायंकाळी ४ ते रात्री ८:३० मोठ्या प्रमाणात वाहतुकीची वर्दळ असल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. याचा ताण व त्रास हा सामान्य जनता, तसेच पोलीस प्रशासनाला देखील होतो. पाथर्डी रोड मार्गे येणारी वाहतूक ही नगर तालुका पोलीस स्टेशन समोरील मार्गाने भिंगार नाला या मार्गे वळविण्यात यावी तसेच नगर मार्गे पाथर्डी रोड कडे जाणारी वाहतूक सरळ मार्गे विजयनगर चौकात सोडण्यात यावी. शुक्रवारी आठवडे बाजाराचा दिवस असल्यामुळे बराचसा शेतकरी वर्ग हा रस्त्यावर दुकान लावतो. त्यामुळे रस्त्यामध्ये अडथळे निर्माण होतात व त्यामुळे छोटे-मोठे अपघात होतात.
बाजाराच्या दिवशी वाहतूक नियंत्रण करण्यासाठी उपायोजना केल्या नाही तर शहर अध्यक्ष गजेंद्र राशिनकर यांच्या मार्गदर्शनाखाली भिंगार वेषीजवळ रस्त्यावर उतरून मोठ्या प्रमाणात मनसे स्टाईल आंदोलन करण्यात येईल असे निवेदन भिंगार पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश राजगुरू यांना दिले. यावेळी मनसेचे शहर उपाध्यक्ष संकेत व्यवहारे,जिल्हाध्यक्ष सचिन डफळ,शहर अध्यक्ष गजेंद्र राशिनकर, विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश गायकवाड , महाराष्ट्र निर्माण सेनेचे शहर सचिव डॉक्टर संतोष साळवे , शहर उपाध्यक्ष किरण रोकडे प्रमोद ठाकूर आदी उपस्थित होते.
- Advertisement -