अन्यथा ११ मे पासून प्रोफेसर चौकात आमरण उपोषण करण्याचा इशारा

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटनेच्या वतीने मनपा आयुक्तांना निवेदन

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा प्रोफेसर चौकात १४ मे रोजी जयंतीच्या दिवशी बसवण्याची मागणी

अन्यथा ११ मे पासून प्रोफेसर चौकात आमरण उपोषण करण्याचा इशारा                         

अहमदनगर (प्रतिनिधी)- धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या १४ मे जयंतीच्या दिवशी प्रोफेसर चौकात पुतळा बसवण्याच्या मागणीसाठी अनेक पत्रव्यवहार करून देखील अद्यापही कारवाई करण्यात आलेली नसल्याने छावा संघटनेच्या वतीने अहमदनगर महानगरपालिका आयुक्त यांना निवेदन देऊन मागणी करण्यात आली आहे की १४ मे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त पुतळा बसवण्यात यावा अन्यथा ११ मे पासून उपोषण सुरू करणार असल्याचे निवेदन देण्यात आले यावेळी छावा संघटनेचे महिला जिल्हा अध्यक्ष सुरेखाताई सांगळे, शिवप्रतिष्ठान जिल्हा अध्यक्ष बापू ठाणगे, दत्ताभाऊ वामन, दीपक गहिले, किरण वाघ, भैय्या पठाण, केशव बरकते, अभय पतंगे, शंकर आटोळे, विलास कराळे, साहेबराव पाचारणे, सुनील ठाकरे आदीसह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पुढे निवेदनात म्हटले आहे की, छावा संघटनेच्या वतीने प्रधान सचिव नगर विकास विभाग मंत्रालय मुंबई यांना दि. २ मे २०२२ रोजी व दि. २३ जून २०२२ रोजी पालकमंत्री यांना दि. १ मे २०२३ रोजी ना हरकत मिळण्याबाबत पत्रव्यवहार केला असून त्यांचा पाठपुरावा आम्ही केला असून अप्पर मुख्य सचिव सार्वजनिक बांधकाम विभाग यांना पण वरील दि. 2 मे २०२२ व २३ जून २०२२ रोजी पत्र देऊन सदर विभागाचे ना हरकत आलेली असून वर्क ऑर्डर झालेली असून काम चालू असून छत्रपती संभाजी राजे जयंती पूर्वी लवकरात लवकर पुतळा बसवण्यात यावा अन्यथा प्रोफेसर चौक अहमदनगर येथे अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटनेच्या वतीने ११ मे २०२४ रोजी आमरण उपोषण करण्यात येणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -
- Advertisement -

Latest Articles

error: Content is protected !!