सामाजिक कार्यासाठी ‘स्नेहबंध’ला कॉमनवेल्थ एक्सेलन्स राष्ट्रीय पुरस्कार
अहमदनगर प्रतिनिधी – सामाजिक कार्यात उत्कृष्ट कार्यासाठी स्नेहबंध सोशल फाउंडेशन ला बॉलीवूड अभिनेत्री अमिशा पटेल यांच्या हस्ते कॉमनवेल्थ एक्सेलन्स नॅशनल अवॉर्ड २०२२ देऊन गौरवण्यात आले.
पुणे येथील ओ हॉटेलमध्ये रविवारी झालेल्या एका कार्यक्रमात हा पुरस्कार स्नेहबंध चे अध्यक्ष उद्धव शिंदे यांनी स्वीकारला. सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते.
याप्रसंगी कॉमनवेल्थ सोसायटी फॉर इंनोवेशन अँड रिसर्चचे संचालक डॉ.प्रशांत सिन्हा, कॉमनवेल्थ सोसायटी फॉर इंनोवेशन अँड रिसर्चचे को-ऑर्डीनेटर डॉ.राकेश मित्तल, सुनील देवरदे, डॉ.महेश ढगे पाटील, डॉ.राजेश शिरोडकर उपस्थित होते.
सामाजिक कार्यासाठी काम करणाऱ्या लोकांच्या कौतुकास्पद प्रयत्नांचे कौतुक करणे हा हेतू या कार्यक्रमाचा होता. त्यांचा सन्मान करा या उद्देशाने हा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता, असे आयोजकांनी सांगितले.
हा सन्मान माझा नसून समाजाचा
दुसऱ्यांना प्रकाश देण्याच्या भावनेमुळे मानवी कल्याण होते.
शंभर हातांनी धन संचय करावे, परंतु ते धन हजार हातांनी समाजासाठी वितरित देखील करावे, ही आपली संस्कृती आहे.समाजाने जे दिले आहे त्याची परतफेड म्हणून आपण समाजाला देणे लागतो ही भावना ठेवून सामाजिक कार्य करत आहे. हा राष्ट्रीय सन्मान माझा एकट्याचा नसून पूर्ण समाजाचा आहे, अशी भावना ‘स्नेहबंध’चे अध्यक्ष उद्धव शिंदे यांनी व्यक्त केली.