अरुणोदय फुटबॉल चषक स्पर्धा उत्साहात संपन्न
क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून खेळाडू घडला जातो – संपत बारस्कर
नगर : शिक्षण क्षेत्राबरोबरच क्रीडा क्षेत्रालाही मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. शालेय क्रीडा प्रकारांमध्ये विविध खेळांचा समावेश झाला असून विद्यार्थ्यांना करिअर करण्यासाठीच्या सुविधा उपलब्ध झाल्या आहे तरी विद्यार्थ्यांनी बालवयातच आपल्या आवडीच्या खेळाकडे लक्ष केंद्रित करावे, जिद्द, चिकाटी व मेहनतीच्या जोरावर यश संपादन करता येते. फुटबॉल हा खेळ जगामध्ये लोकप्रिय खेळ म्हणून ओळखला जात आहे, नगर व भिंगार शहरामध्ये देखील युवक मोठ्या प्रमाणात फुटबॉल खेळाकडे आकर्षित झाले असून सराव करीत आहे, क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून खेळाडू घडला जातो, क्रीडा क्षेत्रामध्ये विद्यार्थ्याला योग्य मार्गदर्शनाची खरी गरज असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर यांनी केले.
नगर वेल्थ गेम्स आयोजित अरुणोदय फुटबॉल चषक स्पर्धा संपन्न झाली, यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर, अमोल गाडे, इंजि. केतन क्षिरसागर, अभिजीत खोसे,मनोज कोतकर, डॉ. सागर बोरुडे,जगजीत सिंग, जितू गंभीर, श्रेणिक शिंगवी, उद्योजक जतीन अहुजा, प्रदीप पंजाबी, हरजीत सिंग वधवा, डॉ. संतोष गांगर्डे, डॉ. सौरभ पंडित, इंजि पंकज झावरे, इंजि अनिल मुरकुटे, ॲड. युवराज शिंदे, ॲड. राजेश कातोरे, किरण बारस्कर, राष्ट्रवादी युवक पदाधिकारी ऋषीकेश जगताप, किरण घुले,दीपक वाघ, शिवम कराळे, कृष्णा शेळके, मंगेश शिंदे,गौरव हरबा, ओंकार म्हसे, केतन ढवन, ओंकार मिसाळ,आशुतोष पानमळकर, दीपक गोरे, भारत जाधव, शुभम चितळकर,साहिल पवार, मयूर रोहाकले,मंगेश जोशी, वैभव ससे, समृद्ध दळवी,पंकज शेंडगे, कुणाल ससाणे, अरबाज शेख, अनिकेत खंडागळे, अभिजीत साठे, स्वप्नील कांबळे, कृष्णा थिटे, संदीप गवळी आदी उपस्थित होते.
इंजि. केतन क्षिरसागर म्हणाले की, विद्यार्थ्यांमध्ये शालेय शिक्षणाबरोबरच खेळाची आवड निर्माण व्हावी यासाठी विविध क्रीडा स्पर्धेचे आयोजन होणे गरजेचे आहे, तरी विविध संस्था, संघटना, मित्र परिवार यांनी पुढाकार घेत विविध क्रीडा स्पर्धेचे आयोजन करावे, खेळाडूंना हक्काचे व्यासपीठ निर्माण व्हावे यासाठी अरुणोदय फुटबॉल चषक स्पर्धा घेण्यात आली असे ते म्हणाले.