अर्चना नाकाडेस विद्यालयाच्या वतीने एक लाख रुपयांचा धनादेश

0
84

कर्जत प्रतिनिधी – गणेश जेवरे

कर्जत तालुक्यामधून जास्तीत जास्त डॉक्टर, इंजिनियर व अधिकारी, उद्योजक  तयार व्हावेत यासाठी केशव आजबे, सर व तालुक्यातील इतर सर्व शिक्षण क्षेत्रातील संस्थाचालक शिक्षक यांनी पुढाकार घ्यावा असे प्रतिपादन आमदार रोहित पवार यांनी कर्जत येथे बोलताना केले.

कर्जत येथील कोटा मेंटोर्स माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय याठिकाणी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार रोहित पवार होते तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा शिक्षण अधिकारी अशोक कडूस, जिल्हा परिषद अहमदनगर येथील शिक्षण विभागातील अधीक्षक वर्ग दोन असलेले सत्यजित मच्छिंद्र, नामदेव राऊत, सुनील शेलार, विषाल मेहेत्रे,  रवी पाटील, इक्बाल काझी ,दीपक यादव, दादा चव्हाण, सुर्या तेजा, जयेंद्र मिस्त्रा, कुलदीप सर हरिदास नाकाडे मुकुंद लगड भाऊसाहेब पठाडे पांडुरंग घुगे व संस्थेचे संस्थापक अध्यक्ष केशव आजबे यांच्यासह अनेक मान्यवर मोठ्या संख्येने नागरिक, विद्यार्थी आणि शिक्षक उपस्थित होते.

या वेळी कोटा मेंटोर्स माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील नीट परीक्षेत बायोलॉजी विषयात देशात प्रथम आलेली अर्चना नाकाडे आयटी इंजीनियरिंग साठी निवड झालेले अभय लगड व महेश पठाडे आणि तेजस घुगे यांचा यावेळी सर्व मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

विद्यालयाच्या वतीने अर्चना नाकाडे या गरीब शेतकरी कुटुंबातील विद्यार्थिनी एक लाख रुपयांचा धनादेश विद्यालयाच्या वतीने आगामी एमबीबीएस शिक्षणासाठी देण्यात आले. तसेच आमदार रोहित पवार यांच्या वाढदिवसाचे निमित्ताने कोटा मेंटोर्स स्कूल यांच्या वतीने अकरावीमध्ये काही गरीब कुटुंबातील होतकरू विद्यार्थ्यांना विनामूल्य प्रवेश देण्यात आला.

यावेळी बोलताना आमदार रोहित पवार म्हणाले की, कर्जत मधील सीबीएससी माध्यमाची शाळा व्हावी ही माझी खूप इच्छा होती व ती केशव आजबे यांनी पूर्ण केली.

कोटा मेंटोर्स माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय या मधील विद्यार्थी यांनी नुकताच झालेला नीट व जी ई ई परीक्षेमध्ये कर्जत तालुक्याच्या इतिहासात नोंद होईल अशा पद्धतीचे यश मिळवले आहे. याचे सर्व श्रेय येथील शिक्षक यांना आहे.

गरीब शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी या महाविद्यालयाने अतिशय चांगले उपक्रम याठिकाणी राबवून विद्यार्थ्यांसाठी केशव आजबे यांनी शैक्षणिक संकुल उभा केले आहे , यामुळे आता येथील विद्यार्थ्यांना मोठ्या शहरांमध्ये जाऊन महागडे क्लासेस लावून अनावश्यक खर्च करण्याची गरज राहिलेली नाही.

कर्जत तालुक्यातील सर्वसामान्य गोरगरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांनी चांगला नियमित अभ्यास करून मोठ्या संख्येने डॉक्टर इंजिनीयर अधिकारी उद्योजक यासह विविध क्षेत्रांमध्ये यश मिळवावे यासारखा आनंद मला दुसरा कोणताही नाही व यासाठी कोटा मेंटोर्स यासह तालुक्यातील सर्व शैक्षणिक संस्थांना आपण लागेल ती मदत करण्यास तयार आहोत असे आमदार रोहित पवार यावेळी बोलताना म्हणाले.

यावेळी बोलताना जिल्हा शिक्षणाधिकारी अशोक खडूस यावेळी बोलताना म्हणाले की, कर्जत तालुक्यात सारख्या ग्रामीण व छोट्या तालुक्यांमध्ये कोटा मेंटोर्स या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थिनी अर्चना नाकाडे नीट परीक्षेत बायोलॉजी विषयात पैकीच्या पैकी गुण मिळवले आहे व याचे सर्व श्रेय केशव आजबे सर आणि त्यांच्या सर्व टीमला जाते.

आज पालक अतिशय जागरूक झालेले आहेत यामुळे मेडिकल म्हटले की लातूर व इंजिनिअरिंग म्हंटले की कोटा या ठिकाणी विद्यार्थ्यांना पाठवण्यात येते परंतु कर्जत येथे श्री आजबे यांनी या दोन्हींचा समन्वय याठिकाणी राबवून कोटा मेंटोर्स या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील सुरू केले आहे.

सीबीएससी धरतीचे शिक्षण या ठिकाणी विद्यार्थ्यांना दिले जात आहे यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आता शहरी भागात जाण्याची आवश्यकता राहिली नाही व त्यांनी स्वतः तयार केलेला आजबे पॅटर्न खरोखरच कौतुकास्पद आहे.

यावेळी प्रास्ताविक करताना या कार्यक्रमाचे संयोजन केशव आजबे म्हणाले की, ग्रामीण भागातील विद्यार्थ्या गुणवत्तापूर्ण आहेत परंतु त्यांना आर्थिक परिस्थिती कमकुवत असल्यामुळे मोठ्या शहरी भागात जाऊन महागडी क्लासेस लावणे परवडत नाही.

लातूर किंवा कोटा या ठिकाणी जाऊन  देखील विद्यार्थ्यांना अनेक अडचणी निर्माण होत असल्याने पुरेसे यश मिळत नव्हते मात्र आपण या ठिकाणी या विद्यालयाच्या माध्यमातून शेकडो विद्यार्थी मेडिकल इंजिनिअरिंग यासारख्या देशपातळीवर परीक्षेमध्ये प्रथम क्रमांक मिळवण्या इतपत शैक्षणिक दर्जा उंचावला आहे आणि हेच माझे स्वप्न होते आणि ते खऱ्या अर्थाने या ठिकाणी पूर्ण झाले आहे.

यावेळी नामदेव राऊत, अर्चना नाकाडे, अभय लगड महेश पठाडे यांचे भाषण झाले आभार व सूत्रसंचालन रोहिणी यादव यांनी केले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here