अर्बन बँकेची एक रकमी परतफेड योजना सुरू; अवसायकांची घोषणा

अर्बन बँकेची एक रकमी परतफेड योजना सुरू; अवसायकांची घोषणा

अहमदनगर : रिझर्व बँकेने नगर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचा बँकिंग परवाना रद्द केल्यानंतर केंद्र शासनाने बँकेवर नोव्हेंबर २०२३ मध्ये अवसायक म्हणून एनसीडीसीचे उपसंचालक गणेश गायकवाड यांची नियुक्ती केली होती. दरम्यानच्या सात महिन्यांच्या कालावधीमध्ये  ०७ जून अखेर बँकेच्या एकुण कर्जा पैकी रुपये १६ कोटी ७०लाख वसूल करण्यात आले आहेत.  मात्र थकीत कर्ज वसुलीला गतिमान करण्यासाठी बँक प्रशासनाने केंद्र शासनाच्या मार्गदर्शन नुसार एकरकमी कर्ज परतफेड योजना ०५ जुन २०२४ पासून सुरू करण्यात आली असल्याचे अवसायक तथा एनसीडीसी चे उपसंचालक गणेश गायकवाड यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
पहील्या व दुसऱ्या टप्प्यात १७२००  ठेवीदारांचे रुपये २९३.५७ कोटी डीआयसीजीसीच्या (भारतीय रिज़र्व बैंक) माध्यमातून परत करण्यात आले असून १५८५७ ठेवीदारांच्या क्लेम फॉर्मची पुर्तता झालेली असून त्यांचे रुपये ६१.८१ कोटी डीआयसीजीसीच्या (भारतीय रिज़र्व बैंक) माध्यमातून लवकरच परत करण्यात येणार असून त्याचे काम अंतिम टप्यात आलेले आहे.
या एक रकमी कर्ज परतफेड योजनेमुळे कर्जदार स्वतःहून मोठ्या प्रमाणात कर्ज थकबाकी भरून आपले कर्ज खाते निल करण्याच्या दृष्टीने पुढे येतील अशा विश्वास अवसायक श्री गायकवाड यांनी  व्यक्त केला.
या योजनेमुळे मोठ्या प्रमाणात थकीत कर्ज वसुली होऊनरक्कम ठेवीदारांच्या ठेवी परत करण्याचा मार्ग सुलभ होणार आहे. त्यामुळे सर्व थकीत कर्जदारांनी या एक रकमी परतफेड (ओटीएस) योजनेचा लाभ घेऊन संभाव्य कायदेशीर कारवाई टाळण्यासाठी आपली थकबाकीची रक्कम लवकरात लवकर भरून बँक प्रशासनास सहकार्य करावे, त्याचबरोबर सर्व खातेदार व ठेवीदार यांनी आपापले केवायसी कागदपत्रे नजीकच्या शाखेत जमा करून ठेवी परत मिळवण्यासाठी क्लेम फॉर्म देखील लवकरात लवकर भरून द्यावेत असे आवाहन देखील अवसायक श्री गायकवाड यांनी केले आहे. थकीत कर्जाची वसुली करून ठेवीदारांना त्यांचे कष्टाचे पैसे परत करण्यासाठी बँक प्रशासन प्रयत्नशील असल्याचे देखील यावेळी श्री गायकवाड यांनी सांगितले.
- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles