अर्बन बँकेचे नूतन संचालक राहुल जामगावकर यांचा सत्कार

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

मिळालेल्या संधीचा उपयोग बँकेच्या प्रगतीत हातभार लावतील – महापौर रोहिणी शेंडगे

अहमदनगर प्रतिनिधी – नगर अर्बन बँकेला मोठी परंपरा आहे, या बँकेच्या सर्वच संचालकांनी बँकेच्या लौकिकात भर टाकली आहे. आताही निवडून आलेले पदाधिकारी हे चांगला कारभार करुन बँकेच्या वैभवात भर टाकतील.

राहुल जमागांवकर यांचा झालेला विजय हा आमच्या परिसरासाठी अभिमानास्पद आहे.ते या मिळालेल्या संधीचा उपयोग करुन बँकेच्या प्रगतीस हातभार लावतील,असा विश्वास महापौर रोहिणी शेंडगे यांनी व्यक्त केला.

नगर अर्बन बँकेच्या निवडणुकीत राहुल जामगावकर यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार महापौर रोहिणी शेंडगे यांच्या हस्ते करण्यात आला.

याप्रसंगी माजी विरोधीपक्ष नेते संजय शेंडगे,नगरसेवक प्रशांत गायकवाड,प्रदीप भापकर,बाळासाहेब व्यापारी, अभिजित दिवटे,संदिप शेंडगे,मनोज मिसाळ,अहमद सय्यद आदि उपस्थित होते.

सत्कारास उत्तर देतांना राहुल जामगांवकर म्हणाले, अर्बन बँकेने सर्वसामान्यांना उभे राहण्यासाठी नेहमीच कर्जरुपी मदतीचा हात दिला आहे.सर्वसामान्यांची बँक म्हणून बँकेची ख्याती आहे.

आता आम्ही सर्व निवडून आलेले नूतन संचालक  बँकेला पुर्नवैभव प्राप्त करुन देण्यासाठी प्रयत्न करतील.आज झालेल्या या सत्कारास आपणास काम करण्यास प्रोत्साहन मिळणार असल्याचे सांगितले.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -
- Advertisement -

Latest Articles

error: Content is protected !!