अल्पवयीन प्रियसी मुलीच्या आत्महत्या नंतर काही तासातच प्रियकर मुलाने देखील केली गळफास घेऊन आत्महत्या.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

जामखेड प्रतिनिधी
( नासीर पठाण )
तालुक्यातील आपटी या ठिकाणी अल्पवयीन प्रियसी मुलीच्या आत्महत्या नंतर काही तासातच प्रियकर मुलाने देखील गळफास घेऊन आत्महत्या केली. एकाच दिवशी दोघा अल्पवयीन मुलगी व मुलाने आत्महत्या केल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. मात्र दोघांनी आत्महत्या का केली या बाबत अद्याप माहिती समजु शकले नाही.

अशोक बंडु कडु, (वय १७) रा. आपटी
व आशा (उर्फ अश्विनी) गोपीनाथ घुले (वय १६) रा. घोडेगाव ता. जामखेड अशी आत्महत्या केलेल्या दोघा अल्पवयीन प्रियकर व प्रियसीची नावे आहेत.

याबाबत समजलेली माहिती अशी की बुधवार दि २४ रोजी जामखेड तालुक्यातील आपटी या ठिकाणी प्रियसी मुलगी आशा गोपीनाथ घुले वय १६ ईने दुपारी बारा ते एकच्या दरम्यान मामाच्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.

ती माहिती याच गावात राहणार्‍या तिचा प्रियकर अशोक बंडु कडु वय १७ रा. आपटी यास समजली यानंतर आपल्या प्रियसीने नक्की आत्महत्या केली आहे का? याची खात्री करण्यासाठी तो प्रियकर अशोक कडु हा मुलीच्या घरी गेला.त्या वेळी आपल्या प्रियसीने आत्महत्या केली आसल्याचे समजले.

यानंतर सदर मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जामखेड ग्रामीण रुग्णालय आणण्यात आला.यानंतर तीचा प्रियकर अशोक कडु या मुलाने देखील व्हॉटसप वर मी देखील माझे जीवन संपवत आहे असा स्टेट्स ठेवला
होता. आणि जे व्हायचे तेच झाले.

त्याच दिवशी दि २४ रोजी काही तासातच म्हणजे दुपारी तीनच्या दरम्यान मुलाने देखील शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या बाबत दोघांनीही आत्महत्या का केली याची माहिती अद्याप समोर आली नसुन दोघांचे प्रेम संबध होते अशी माहिती समोर आली आहे.

पोलीस त्या दृष्टीने तपास करीत आहेत. घटनेची माहिती समजताच घटनास्थळी पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड, सपोनि सुनिल बडे, पो.ना संभाजी शेंडे, पो. कॉ. शशी मस्के व पो. कॉ. संजय जायभाय यांनी भेट दिली.

पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.मुलीने आत्महत्या केल्यावर मुलीकडील मंडळी गुन्हा दाखल करण्याच्या तयारीत होते.पण एका तासात मुलानेही आपली जीवनयात्रा संपवली आहे .

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -
- Advertisement -

Latest Articles

error: Content is protected !!