अवतार मेहेरबाबाच्या समाधी गुरुवारपासून दर्शनाला खुली 

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

मेहेरप्रेमीसाठी ट्रस्टने बनवले मार्गदर्शक नियम

अहमदनगर प्रतिनिधी – महेश कांबळे

येथील अरणगाव रोडवरील मेहेराबाद येथे अवतार मेहेरबाबा यांच्या समाधीस्थळ गुरुवारी दि ७ ऑक्टोबर पासून शासन परवानगीने कोरोना नियमांचे पालन करीत मेहेरप्रेमींना दर्शनासाठी खुले होणार आहे.कोरोना काळामुळे समाधी दर्शनासाठी बंद होते याबाबत ट्रस्टने काही नियम केले आहेत अशी माहिती डॉ.मेहेरनाथ कलचुरी यांनी दिली.

अवतार मेहेरबाबा ट्रस्टचे अध्यक्ष श्रीधर केळकर यांनी एका पत्रकाद्वारे माहिती दिली आहे.आम्हाला हे घोषित करताना खूप आनंद होत आहे की,प्रिय अवतार मेहेर बाबांच्या समाधीचे दरवाजे ७ ऑक्टोबर २०२१ पासून पुन्हा एकदा महाराष्ट्रातील सर्व मंदिरे आणि धार्मिक उपासना स्थळांसाठी राज्य सरकारच्या निर्देशानुसार उघडले जातील,त्याप्रमाणे स्वाभाविकपणे अवतार मेहेरबाबांची समाधी उघडणार आहोत.

सरकारच्या नियमामुळे,समाधीचे दरवाजे उघडले जातील तथापि समाधी दरवाजासमोर आणि उंबरठ्यावरील स्क्रीन(काच) राहील;कोणत्याही भाविकाला दारापुढे नतमस्तक होता येणार नाही,दरवाजाबाहेरून दर्शन घ्यावे लागेल,प्रसाद,आरती किंवा प्रार्थना होणार नाही,कोणीही फुले किंवा हार घालणार नाही,समाधी समोर कोणाला बसता येणार नाही.

दरवाजातून दर्शनासाठी रांगेत असलेल्या सर्वांनी मास्क घातलेला असावा,समाधी परिसरात प्रवेश करताना हँड सॅनिटायझरचा वापर केला असेल आणि समाधी भोवती फिरताना ६ फूट अंतराचे चिन्हांकित सामाजिक अंतर पाळणे बंधनकारक आहे.दर्शनाची वेळ सकाळी ७ ते संध्याकाळी ७.३० पर्यंत असेल.

यावेळी स्वयंसेवक नियमाचे पालन भाविक करतात कि नाही हे पाहतील कोरोना वाढणार नाही स्वतः व दुसऱ्याला त्रास होणार नाही,या उद्देशाने ट्रस्टने हे नियम बनविले आहे.त्याची अंमलबजावणी करणे दर्शनाला येणाऱ्या प्रर्त्येकला बंधनकारक आहे.तसेच बाबांची केबिन आणि टेकडीवरील इतर सर्व ऐतिहासिक खोल्या बंद राहणार आहेत.

तसेच ट्रस्टचे भक्त निवास,न्यू एम पी आर व हॉस्टेल डी हे यात्रेकरूंच्या निवासस्थान हे २२ ऑक्टोबरला उघडणार असून या निवासस्थानांमध्ये सर्व सरकारी आरोग्य आणि सुरक्षा मार्गदर्शक तत्त्वांचा कडकपणे समावेश करून आणि राहण्याची मर्यादा घालून म्हणजेच कॅप्यासिटीच्या निम्म्या लोकांना देण्यात येईल व सर्वांच्या सुरक्षिततेसाठी ट्रस्टने अतिरिक्त खबरदारी देखील घेतली जाईल.ज्यांनी रिजर्वेशन केले व कोरोना लसीचे २ डोस घेतले त्यांनाच प्रवेश देण्यात येईल,इतर लोकांना प्रवेश दिला जाणार नाही.

ज्यांनी रिजर्वेशन केले अशा लोकांनाच या ठिकाणच्या भोजनालयात प्रवेश मिळणार आहे.इतरांना जेवण मिळणार नाही,तसेच मेहेराबाद येथे काही आठवड्यांसाठी कसे नियोजन होते हे पाहिल्यानंतर पिपळगाव माळवी येथील मेहेराजाद देखील मेहरप्रेमी साठी पुन्हा खुले करण्यात येणार आहे.

तरी मेहेरप्रेमींनी सहकार्य करावे असे आवाहन ट्रस्टच्या वतीने ट्रस्टच्या वतीने चेअरमन श्रीधर केळकर,विश्वस्त मेहरनाथ कलचुरी,रमेश जंगले,जाल दस्तूर त्यांच्यासह सर्व विश्वस्त यांनी केले आहे.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -
- Advertisement -

Latest Articles

error: Content is protected !!