अवतार मेहेरबाबा सेंटरचा ६१ वा वर्धापन दिन उत्सवात साजरा.

0
100

अरणगाव प्रतिनिधी – काशिनाथ बोरगे

अवतार मेहेर बाबा सेंटर अरणगाव २ जानेवारी २०२२ रोजी अवतार मेहेरबाबा सेंटरचा ६१ वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला.

अरणगाव सेंटरची स्थापना सन १९६० साली श्री अवतार मेहेरबाबा यांच्या हस्ते अरणगाव सेंटरची स्थापना झाली.तेव्हापासून ते आतापर्यंत म्हणजे २०२२ या सालापर्यंत जंगले मास्तर यांची फॅमिली,गावातील बाबा प्रेमी असे सर्वजण मिळून सेंटर चालवीत आहेत.

प्रत्येक गुरुवारी संध्याकाळी सात ते नऊ पर्यंत आम्ही येथे भजन करतो.यात विदेशातील काही लोक पण सेंटर मध्ये येऊन भजन म्हणतात.शेवटी प्रार्थना आरती होते,प्रसाद वाटला जातो.या प्रमाणे आमचे सेंटर चालते.

या कार्यक्रमाला अवतार मेहेरबाबा ट्रस्टचे चेअरमन श्री. श्रीधर केळकर व ट्रस्टी श्री.रमेश जंगले,श्री प्रसाद राजू, सरपंच सौ स्वाती मोहन गहिले,उपसरपंच सुरेश जाधव,श्रीमती प्रभावती पाटील,श्रीमती ताराबाई भालेकर,श्रीमती टेंभेकर,सौ निलिमा कांबळे,श्री जालु पुंड, नवले काका,पंढरीनाथ भस्मे, जालू,दिलीप कांबळे,मेहेरदीप पाटील,सोमनाथ भाऊसाहेब गहिले,जल्लू,भैय्या माळवदे, रावसाहेब,जॉन तसेच देशा विदेशाचे सर्व बाबा प्रेमी या कार्यक्रमास उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here