अशी पाखरे येती आणिक स्मृती ठेवुनी जाती….
भारावलेल्या वातावरणात इयत्ता चौथी अरणगाव शाळेचा निरोप समारंभ संपन्न
अरणगाव (वार्ताहर ) : काशिनाथ बोरगे
आज दिनांक 13 एप्रिल 2024 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा अरणगाव येथे इयत्ता चौथी 2023 -24 या शैक्षणिक वर्षातील विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ अतिशय भावूक वातावरणात संपन्न झाला.अरणगाव शाळेत इयत्ता पहिली मध्ये 2020-21 रोजी हे विद्यार्थी दाखल झाले होते.यावेळी कोरोनामुळे शाळा बंद होत्या.या मुलांच्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात ऑनलाइन क्लासेस ने झाली. निरोप समारंभासाठी शाळेतील मुख्याध्यापिका रेखा लहाकर मॅडम व शाळेचे सर्व शिक्षक वृंद तसेच चौथीच्या मुलांचे पालक उपस्थित होते.
यावेळी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले .पालकांनी ही आपली मनोगत व्यक्त केली व विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
चौथीच्या वर्गशिक्षिका श्रीमती कमल गवळी व ज्योती कदम मॅडम यांनी मुलांना मार्गदर्शन केले.शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती रेखा लहाकर मॅडम यांनीही मुलांना अतिशय मोलाचे मार्गदर्शन केले.
मुलांना निरोप समारंभ निमित्त खाऊचे वाटप करण्यात आला. व इयत्ता चौथीच्या वर्गाकडून शाळेसाठी झाडाच्या कुंड्या देण्यात आल्या .
अरणगाव केंद्राचे केंद्रप्रमुख माननीय उदयकुमार सोनावळे साहेब यांच्या हस्ते शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले.सोनावळे साहेबांनी शिष्यवृत्ती सर्व पात्र विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
जिल्हा परिषद केंद्र शाळा अरणगाव यांच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा.