श्रीरामपूर प्रतिनिधी – राहता तालुक्यातील अस्तगाव येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखा अस्तगाव येथील क्लार्क जयेश लोहाडे यांची बदली स्थगित करावी.तसेच पूर्वी रिक्त झालेली शिपाई व क्लार्क हे पद झोनल ऑफीसला कळवून त्वरित भरण्यात यावे व ग्राहकांची गैरसोय टाळण्यात यावी.
यासाठी कॉंग्रेस पक्षातर्फे शाखाधिकारी खर्डे मॅडम यांना निवेदन देण्यात आले.त्यावेळी काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष ॲड पंकज लोंढे, अस्तगांव शहर अध्यक्ष बबनराव नळे, दादासाहेब गवांदे ,युवक काँग्रेस कार्याध्यक्ष गणेश चोळके, युवक तालुका सरचिटणीस प्रविण घोडेकर,अल्पसंख्यांक तालुका उपाध्यक्ष जाकीर शेख,तालुका सरचिटणीस अमीन पटेल, दिलीप नळे, अजय त्रिभुवन, अनिल देसाई आदी कार्यकर्ते उपस्थित होते