अहमदनगर जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने एस के क्रिकेट ॲकॅडमी आयोजित एपीएल क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ संपन्न
मुलांच्या बुद्धीच्या विकासाबरोबरच शारीरिक विकास महत्त्वाचा – सचिन जगताप
नगर : मुलांना बाल वयातच बुद्धीच्या विकासाबरोबर शारीरिक विकास झाले पाहिजेत यासाठी मैदानी खेळाची अत्यंत आवश्यकता आहे. आपल्या पालकांपुढे पाल्याची विविध आव्हाने उभी असून क्रीडा स्पर्धेमध्ये देखील करिअर करण्याच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. यासाठी मुलांच्या आवडीचा खेळ निवडा बाल वयातच क्रिकेटचे धडे मिळावेत यासाठी एस के क्रिकेट अकॅडमीने 14 वर्षे वयोगटा खालील खेळाडूंना हक्काचे व्यासपीठ निर्माण करून दिले आहे. त्या माध्यमातून नगर जिल्ह्यामध्ये चांगले खेळाडू निर्माण होतील असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मा.सदस्य सचिन जगताप यांनी केले.
अहमदनगर जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने एस के क्रिकेट ॲकॅडमी आयोजित एपीएल क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सचिन जगताप यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी माजी महापौर बाबासाहेब वाकळे, प्रा. माणिकराव विधाते, गणेश गोंडाळ, करण कराळे, रवी वाकळे, एस के क्रिकेट ॲकॅडमी चे संचालक संदीप आडोळे, सार्थक ख्रिस्ती, अजय कविटकर, संदीप घोडके, सागर बनसोडे, सागर गलांडे, दीपक आडोळे, मनोज अडोळे, वसंत अडोळे, सागर पंजाबी, अमोल दंडवते, विशाल वाकळे, टीम मालक सम्राट देशमुख, वैभव करंडे, करण भोगाडे, संदीप घोडके, किशोर वाकळे, महेश गलांडे, राजेंद्र वाकळे, डॉ.हर्षवर्धन धनवार, अमोल दंडवते, गजानन कराळे, रोहित जैन, विनीत म्हस्के, सुहास शिरसाट, आदी उपस्थित होते.
मा.महापौर बाबासाहेब वाकळे म्हणाले की, खेळाडू घडण्याचे काम स्पर्धेच्या माध्यमातून होत असते. क्रिकेटपटूला बालवयातच लेदर बॉल वर क्रिकेटचे सामने खेळवणे गरजेचे आहे. जेणेकरून तो स्पर्धेच्या युगामध्ये टिकेल, यशाच्या शिखरावर जाण्यासाठी जिद्द, चिकाटी व मेहनतीची खरी गरज आहे. स्पर्धेच्या माध्यमातून खेळाडूंमध्ये एकोपा निर्माण होत असतो. नेहमीच खेळाडूंना हक्काचे व्यासपीठ निर्माण करून देण्यासाठी त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहत असतो. क्रिकेटर्स संदीप आडोळे हे एस के क्रिकेट अकॅडमीच्या माध्यमातून चांगले खेळाडू निर्माण करीत असल्याचे ते म्हणाले. यावेळी रवी वाकळे,करण कराळे,प्रा.माणिकराव विधाते, अजय कविटकर आदींची भाषणे यावेळी झाली.
- Advertisement -