संघांना नांव नोंदणी करण्याचे आवाहन
अहमदनगर (प्रतिनिधी)- लहान मुला-मुलींमध्ये फुटबॉल खेळाची आवड निर्माण होण्यासाठी अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या मान्यतेने अहमदनगर जिल्हा फुटबॉल संघटनेच्या वतीने शहरात बारा व चौदा वर्षा आतील जिल्हास्तरीय गोल्डन बेबी लिग फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात ही स्पर्धा सावेडी येथील गुलमोहर फुटबॉल क्लब व फ्रेंड्स फुटबॉल क्लबच्या मैदानात होणार असून, या स्पर्धेसाठी संघांनी नांव नोंदणी करण्याचे आवाहन संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया व संघटनेचे सचिव तथा वेस्टर्न इंडिया फुटबॉल संघटनेचे कार्यकारी सदस्य गॉडविन डिक यांनी केले आहे.
या स्पर्धेतील सामान्यांचा निकाल, अहवाल, स्पर्धेत सहभागी संघ आणि खेळाडूंची माहिती महासंघ आणि राज्य संघांना सादर केली जाणार आहे.
सदर स्पर्धेसाठी जिल्हा संघटनेद्वारे अधिकृत आयोजक म्हणून ग्रासरुट लिडर पल्लवी रुपेश सैंदाणे, प्रसाद पाटोळे, सुभाष कनोजिया, जॉय जोसेफ, संघटनेचे सहसचिव गोपीचंद परदेशी यांची निवड करण्यात आली आहे.
बारा वर्षा आतील (जन्म १ जानेवारी २००९ नंतर) व १४ वर्षा आतील (जन्म १ जानेवारी २००७ नंतर) मुला-मुलींना या स्पर्धेत खेळता येणार आहे.सर्व सामने सेव्हन ए साईट या पध्दतीने खेळविण्यात येणार आहेत.एक संघांमध्ये दहा खेळाडू राहणार असून, एका क्लबला एकापेक्षा जास्त संघ रजिस्टर करता येऊ शकणार आहे.
विजयी व उपविजयी संघास चषक व वैयक्तिक बक्षिसे देण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांच्या वतीने देण्यात आली आहे.स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणार्या संघांनी 8796858947 या नंबरवर संपर्क साधून नांव नोंदणी करण्याचे सांगण्यात आले आहे.