अहमदनगर जिल्हा श्रमिक असंघटित कष्टकरी कामगार संघटनेचा नागरिकांना मतदार जागृती
अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्हा श्रमिक असंघटित कष्टकरी कामगार संघटनेच्या वतीने लोकसभा मतदान २०२४ च्या नागरिकांना मतदार जागृती अभियान राबवून डॉ. बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मतदार जागृती रॅली काढून चौक सभा घेण्यात आल्या यावेळी अहमदनगर जिल्हा श्रमिक असंघटित कष्टकरी कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विलास कराळे पाटील समवेत सामाजिक कार्यकर्ते अशोक सबंन, सुधीर भद्रे, जुनेद बागवान, सोपान दळवी, वसंतराव मोकाटे आदी उपस्थित होते.
अहमदनगर जिल्हा श्रमिक असंघटित कष्टकरी कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विलास कराळे पाटील म्हणाले की, नागरिकांनी स्वतःहून मतदान करण्याची गरज आहे. या विचाराने सशक्त भारत घडणार असल्याचे सांगितले व लोकशाही मजबूत होणार आहे.
आपल्या एका मताने चांगला व सक्षम उमेदवार निवडून आल्यास त्या लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून नागरिकांचे प्रश्न सुटतील. मतदान समाजाचे भविष्य घडविण्यासाठी उपयुक्त ठरत असून, मतदान करणे हे प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य असल्याचे त्यांनी सांगितले.
संघटनेच्या वतीने घेतलेल्या मतदार जागृती अभियानात चौका चौकात सभा घेऊन नागरिकांना मतदान करण्याचे आव्हान करण्यात आले व मतदानाविषयी माहिती देण्यात आली.