बॅलन्स सीट जुळल्यानंतर पालकमंत्री जिल्ह्यात येतील :- खासदार डॉक्टर सुजय विखेंचा घणाघात
अहमदनगर प्रतिनिधी – लहू दळवी
जिल्ह्यात अतिवृष्टी झालेल्या भागातील शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून तातडीची आर्थिक मदत मिळावी या मागणीसाठी अहमदनगर जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज लक्षणीय उपोषण करण्यात आले नगर जिल्ह्याच्या काही भागात अतिवृष्टी मुळे मोठे नुकसान झाले आहे त्या भागात आत्तापर्यंत पालक मंत्री हसन मुश्रीफ यांनी भेट दिली नाही.
या पार्श्वभूमीवर बोलताना खासदार सुजय विखे यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ हे त्यांचे बॅलन्स चेक करत आहे ते त्यांचे अकाउंट बुक पाहत आहेत नेमके किती पैसे आले किती गेले हे आता कळू द्या त्यानंतरच ते नगर जिल्ह्यात येतील असा टोलाही यावेळी खासदार सुजय विखे पाटील यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना लावला.
शेवगाव पाथर्डी नगर तालुक्यातील अतिवृष्टीने बाधीत झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या.अशी मागणी भारतीय जनता पार्टीच्या आमदार मोनिका राजळे माजी राज्यमंत्री शिवाजीराव कर्डिले माजी जलसंधारण मंत्री राम शिंदे यांनी यावेळी केली.
सध्या विजेचा लपंडाव चालू आहे त्यामुळे पाणी योजनेवर याचा मोठा परिणाम होत असून ग्रामपंचायतीला वीज बिले भरणे सक्तीचे करण्यात येत आहे या विषयाकडे यावेळी माजी राज्यमंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी लक्ष वेधले.
या उपोषणामध्ये खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्यासह भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माजी मंत्री प्रा. राम शिंदे आमदार मोनिका राजळे माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले भाजपा जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे प्रदेश कार्यकारणी सदस्य प्रा भानुदास बेरड हरिभाऊ कर्डिले सुरेश सुंबे भारतीय जनता पार्टीचे शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे सुजित झावरे दिलीप भालसिंग अॉ. विवेक नाईक संतोष म्हस्के अमोल भणगडे अशोक खेडकर संतोष लगड बाळासाहेब महाडिक बाळासाहेब पोटधन जे . बी.वांडेकर राम पानमळकर आदींसह भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते