अहमदनगर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवावी

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उपमुख्यमंत्री अजित पवारांना राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे निवेदन

अहमदनगर : जिल्ह्यामध्ये गेल्या १० महिन्यापासून पोलीस अधीक्षक राकेश ओला हे नियुक्त झाल्यापासून त्यांच्या कार्यकालामध्ये खुप मोठ्या प्रमाणात जातीय दंगली तसेच टोळी युध्द जास्त प्रमाणात वाढले आहे. तसेच अहमदनगर जिल्ह्यामध्ये अवैध धंदे खुप मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे त्यातून मिळणा-या भरमसाठ पैश्यातून अहमदनगर जिल्ह्यात गुन्हेगारांनी डोके वरती काढले आहे.अशा गुन्हेगारांमुळे जातीय दंगली मोठ्या प्रामणात होऊ लागले आहेत..

तसेच अहमदनगर शहरातील मुकुंदनगर भागामधील एका मिरवणुकीमध्ये औरंगजेबाचे फोटो घेऊन काही युवक नाचत होते. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये त्याचे जास्त प्रमाणात पडसाद उमटले आणि शेवगाव तालुक्यामध्ये हिंदु मुस्लीम मध्ये जातीय दंगल झाली.

संगमनेर तालुक्यात सुध्दा याचे पडसाद उमटून मोठ्या प्रमाणावर जातीय दंगल उसळली. तसेच अहमदनगर शहरामध्ये रामवाडी, कोठला भागात तसेच माळीवाडा. सूर्यनगर, एम.जी.रोड, कापड बाजार या भागांमध्ये हिंदु मुस्लीम दंगली उसळल्यामुळे कित्येक व्यापारी व गोरगरीब नागरिकांचे त्यामध्ये नुकसान झाले. तसेच लव जिहादचे प्रकार आणि जातीय धर्मांतराचे प्रकरणात वाढ झालेली आहे. त्यामुळे अहमदनगर जिल्ह्यातील नागरिक सुरक्षीत नसून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे.

तसेच सराईत गुन्हेगारांवर मोक्का अंतर्गत कारवाई, तडीपारीची कारवाई ही थंड झालेली आहे.त्यामुळे गुन्हेगारांनी अहमदनगर जिल्ह्यात डोके वरती काढलेले आहे.

अहमदनगर शहरामध्ये झालेले टोळी युध्दामुळे तोफखाना पोलीस स्टेशन हद्दीमध्ये दोन युवकांची हत्या झाली आहे. त्यानंतर कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये दोन हत्या झालेल्या आहेत. तरी त्याची अजून उकल झालेली नसल्याने त्यामुळे पोलीस प्रशासनाबद्दल साशंकता निर्माण झालेली आहे. या घटना दोन महिन्यामध्ये अहमदनगर शहरामध्ये घडल्या आहेत. तरी ही पोलीस प्रशानाचा अजूनही गुन्हेगारांवर वचक बसलेला नाही.

अहमदनगर जिल्ह्यामध्ये पोलीस अधीक्षक यांनी रस्त्यावर उतरुन खमकी भूमिका घेणे आवश्यक आहे. जेणेकरुन गुन्हेगारांवर वचक निर्माण होईल. अन्यथा सक्षम पोलीस अधीक्षक अहमदनगर जिल्ह्यासाठी तातडीने नेमणे गरजेचे आहे. जेणेकरुन अहमदनगर जिल्ह्यातील जनता ही सुरक्षित राहील अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे नगर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने निवेदनातून केली.

यावेळी शहर जिल्हाध्यक्ष पा. माणिकराव विधाते, कार्याध्यक्ष अभिजित खोसे, सुमित कुलकर्णी, अमित खामकर यांच्यासह नागरिक उपस्थित होते.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -
- Advertisement -

Latest Articles

error: Content is protected !!