अहमदनगर डिस्ट्रिक्ट टॅक्स प्रॅक्टिशनर असोसिएशनच्या अध्यक्षपदी किशोर गांधी यांची नियुक्ती

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

कर सल्लागारांच्या अडी-अडचणी सोडविण्यासाठी संघटनेची स्थापना – किशोर गांधी

अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील आयकर, विक्रीकर, जीएसटी सल्लागार आणि विशेषत: ज्युनियर प्रॅक्टिशनर यांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी अहमदनगर डिस्ट्रिक्ट टॅक्स प्रॅक्टिशनर असोसिएशनची स्थापना करण्यात आली आहे.नॉर्थ महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर असोसिएशनशी संलग्न असलेल्या या संघटनेची अधिकृत नोंदणी करुन कार्यकारणी जाहीर करण्यात आली.

ज्येष्ठ कर सल्लागार किशोर गांधी, रमेश भळगट, प्रदीप गोहाड, अरुण लहामगे यांच्या मार्गदर्शनाखाली संस्था स्थापन करण्यात आली आहे.संघटनेच्या सर्व सभासदांची नुकतीच बैठक पार पडली.यामध्ये अध्यक्षपदी किशोर गांधी,उपाध्यक्षपदी सुनिल फळे, नितीन डोंगरे,सचिवपदी प्रसाद किंबहुणे,सहसचिवपदी सोहनलाल बरमेचा, खजिनदारपदी अंबादास गाजुल तर कार्यकारणी संचालकपदी आनंद लहामगे,पुरुषोत्तम रोहिडा,आशीश मुथा,अमित पितळे,निलेश चोरबेले यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

जीएसटी व आयकर कायद्यांमध्ये विविध प्रकारचे बदल वारंवार होणारे नोटिफिकेशन,सर्क्युलरद्वारे केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून सुचित करण्यात येतात.या वारंवार बदलामुळे सदर तरतुदी समजून घेण्यास व्यापारी वर्ग, विशेषत: कर सल्लागार यांना मोठ्या प्रमाणात अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.निर्माण झालेल्या या प्रश्‍नासंदर्भात नुकतेच आनंद लहामगे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व राष्ट्रवादीचे राष्ट्रीय नेते खा. शरद पवार यांची भेट घेऊन निवेदन देखील दिले होते. कर सल्लागारांच्या अडी-अडचणी सोडविण्यासाठी एक संघटना असावी या भावनेने जिल्ह्यातील सर्व कर सल्लागार यांनी एकत्र येऊन या संघटनेची स्थापना केली आहे. ज्ञान आणि सेवांसाठी एकता हा या संस्थेचा मुख्य उद्देश असून, हेच ब्रिदवाक्य घेऊन संघटना कार्यरत राहणार असल्याचे अध्यक्ष किशोर गांधी यांनी म्हंटले.

कार्यकारी संचालक आनंद लहामगे म्हणाले की, ज्युनिअर व सिनीयरची फळी कमी करुन कर सल्लागार असोसिएशनच्या माध्यमातून सर्व कर सल्लागार एकत्र आले आहे.नवीन कर सल्लागारांना येणार्‍या अडी-अडचणी दूर करण्याचे काम असोसिएशनच्या माध्यमातून केले जाणार आहे.व्यापार्‍यांना सेवा देण्यासाठी असोसिएशन प्रयत्नशील राहणार असून, नोंदणी होण्यापुर्वीपासून कर सल्लागारांसाठी मादर्शक ऑनलाईन वेबीनारचे आयोजन वर्षभरापासून करण्यात आले होते.ही नोंदणीकृत संस्था कर सल्लागारांसाठी दिशादर्शक ठरणार असून,त्याची मुहुर्तमेढ रोवण्यात आली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.निलेश चोरबेले यांनी कर सल्लागार असोसिएशनची स्थापना होऊन एक नवोदितांना व्यासपिठ मिळाले असल्याचे सांगितले.

उपाध्यक्ष नितीन डोंगरे यांनी भौगोलिक दृष्टया सर्वात मोठा जिल्हा असलेल्या अहमदनगरमध्ये कर सल्लागारांचे कार्यक्षेत्र देखील मोठे असून, जिल्ह्यात अनेक कर सल्लागार व्यावसायिकांना सेवा देत आहे. ही सेवा देत असताना सुसज्जता आनण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून सर्व कर सल्लागार एकत्र आले असल्याचे त्यांनी सांगितले.

सचिव प्रसाद किंबहुणे म्हणाले की, मागील काही वर्षापासून जिल्ह्यातील सर्व कर सल्लागार एकत्र येऊन कार्य करत आहे. नुकतेच संस्थेची अधिकृत नोंदणी करण्यात आली असून, कर सल्लागारांचे अडी-अडचणी दूर होण्यासाठी असोसिएशनच्या माध्यमातून ज्येष्ठ कर सल्लागारांचे मार्गदर्शन मिळणार असल्याचे स्पष्ट करुन जिल्ह्यातील सर्व कर सल्लागारांनी या अधिकृत व नोंदणीकृत संस्थेचे सभासद होण्याचे आवाहन त्यांनी केले.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -
- Advertisement -

Latest Articles

error: Content is protected !!