अहमदनगर (प्रतिनिधी)- आयकर विभागाचे नुतन उपायुक्त अशोक मुराई यांनी अहमदनगर जिल्ह्याचा पदभार घेतला असता,अहमदनगर डिस्ट्रिक्ट टॅक्स प्रॅक्टिशनर असोसिएशनच्या वतीने त्यांचे स्वागत करुन सत्कार करण्यात आला.असोसिएशनचे अध्यक्ष किशोर गांधी व कार्यकारणी संचालक आनंद लहामगे यांनी त्यांचा सत्कार केला.
यावेळी उपाध्यक्ष सुनिल फळे, नितीन डोंगरे, सचिव प्रसाद किंबहुणे, सहसचिव सोहनलाल बरमेचा, खजिनदार अंबादास गाजुल, कार्यकारणी संचालक पुरुषोत्तम रोहिडा, आशीश मुथा, अमित पितळे, निलेश चोरबेले, सुनिल कराळे, सुनिल सरोदे आदी उपस्थित होते.
असोसिएशनचे अध्यक्ष किशोर गांधी यांनी अहमदनगर डिस्ट्रिक्ट टॅक्स प्रॅक्टिशनर असोसिएशनच्या माध्यमातून सर्व कर सल्लागार व्यापारी व उद्योजकांचे कर संबंधी अडीअडचणी सोडवून सेवा देत आहेत.आयकर विभागाच्या समन्वयाने कर सल्लागारांचे कार्य सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.
आनंद लहामगे म्हणाले की, केंद्राला महसुल मिळवून देण्यासाठी मध्यस्थिची भूमिका कर सल्लागार पार पाडत आहे. केंद्र सरकारकडून वेळोवेळी कराबाबत होणारे बदलाचा अभ्यास करुन ही सेवा व्यापार्यांना दिली जात आहे. संघटनेच्या माध्यमातून सर्व सिनियर व ज्युनियर प्रॅक्टिशनर एकत्रित काम करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.