अहमदनगर मर्चंट बँकेतील कॅशियर संतोष गुगळे व अभिषेक भंडारी यांचा प्रामाणिक पणा…

- Advertisement -

अहमदनगर प्रतिनिधी – दिपक कासवा

अजूनही जगात प्रामाणिक माणसे आहेत याचे उदाहरण म्हणजे मर्चंट बँकेतील कर्मचारी.अहमदनगर मर्चंट बँकेतील कर्मचाऱ्याचा प्रामाणिकपणाचे आत्तापर्यत भरपूर उदाहरणे आपल्या समोर आली आहेत.त्यापैकी आत्ताचे आजून एक उदाहरण…

कामाच्या घाईगडबडीत ३०-३० हजाराच्या दोन स्लिपा भरून ७० हजाराची रोकड बँकेच्या कॅशियरकडे दिली.परंतु सायंकाळी तुमचे १० हजार रुपये जादा आले ते परत घेऊन जा,असा कॅशियरचा फोन आल्यानंतर व्यापारी संतोष गांधी यांच्या ही बाब लक्षात आली.गांधी यांना हा सुखद अनुभव आला तो अहमदनगर मर्चन्टस् बँकेच्या दाळमंडई शाखेतून कॅशियरसह बँकेच्या कर्मचार्‍यांनी दाखविलेल्या या प्रामाणिकपणाबद्दल गांधी यांनी त्यांचे आभार मानले.

सविस्तर माहिती अशी की प्रेमदान हडको सावेडी येथील संतोष मोतीलाल गांधी हे व्यापारी व एलआयसी अभिकर्ता असल्याने पैसे चेक्स भरण्यासाठी मर्चन्ट बँकेत नेहमीच जातात.विशेषतः दाळमंडईच्या सर्वप्रथम व गजबजलेल्या शाखेत त्यांचे अनेक वर्षापासून व्यवहार करतात आणि त्यांना पुन्हा एकदा तेथील कर्मचार्‍यांचा सुखद अनुभव आला.

७० हजार रोख भरणा करण्यासाठी आले असता कामाच्या गडबडीत त्यांनी ३० हजारांच्या २ स्लिपा करून पूर्ण कॅशियरकडे दिले.संध्याकाळी कॅशियर संतोष गुगळे व अभिषेक भंडारी यांचा त्यांना १० हजार रुपये रक्कम जास्त आल्याचा फोन आला आणि तेव्हा कुठे त्यांना हे कळले.या प्रामाणिकपणाबद्दल व्यापारी संतोष मोतीलाल गांधी यांनी कॅशियर अभिषेक भंडारी, संतोष गुगळे यांचे कृतज्ञतापूर्वक आभार मानले.

आम्हा व्यापारांना ५० वर्षापासून मर्चन्ट बँकेचा सर्वतोपरी आधार असून आम्ही मर्चंट बँकेचा खातेदार, सभासद असल्याचा उल्लेख संतोष गांधी यांनी आवर्जून केला.रोखपाल अभिषेक भंडारी व संतोष गुगळे यांचे शाखाधिकारी चिपोळे व अधिकारी सौ.अंकम यांनी अभिनंदन करून कौतुक केले.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles