अहमदनगर महानगरपालिका कर्मचारी पतसंस्थेच्या वतीने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य समाजासाठी दिशादर्शक : चेअरमन किशोर कानडे
नगर : भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य समाजासाठी दिशादर्शक ठरले आहे. भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून सर्वांना समान न्याय देण्याचे काम केले आहे. लोकशाहीच्या माध्यमातून समानतेची एकतेची वागणूक आपल्या सर्वांना मिळाली आहे. सर्वसामान्य माणसाला विविध पदावर काम करण्याची संधी मिळाली, त्या माध्यमातून आपले कर्तव्य सिद्ध करता आले आहे. जाती जाती मधील भेद नष्ट करून शिक्षणाचे महत्त्व समाजाला पटवून देण्याचे काम भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केले आहे. मनपा पतसंस्थेच्या माध्यमातून महापुरुषांची जयंती साजरी करत त्यांच्या विचारांचा संदेश देण्याचे काम करत आहे, असे प्रतिपादन चेअरमन किशोर कानडे यांनी केले.
अहमदनगर मनपा कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या वतीने भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी चेअरमन किशोर कानडे, व्हा. चेअरमन सोमनाथ सोनवणे, तज्ञ संचालक जितेंद्र सारसर, ज्येष्ठ संचालक बाबासाहेब मुदगल, सतीश ताठे, विकास गीते, श्रीधर देशपांडे, बलराज गायकवाड, अजय कांबळे, बाळासाहेब गंगेकर, बाळासाहेब पवार, विजय कोतकर, कैलास चावरे, गुलाब गाडे, अनंत लोखंडे, संचालिका प्रमिला पवार, उषा वैराळ, कार्यलक्षी संचालक आनंद तिवारी आदी उपस्थित होते.
व्हाईस चेअरमन सोमनाथ सोनवणे म्हणाले की, अहमदनगर महानगरपालिका कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या माध्यमातून वर्षभर विविध महापुरुषांची जयंती पुण्यतिथी साजरी केली जाते, त्यामुळे काम करण्याची ऊर्जा व प्रेरणा मिळत असते, असे ते म्हणाले.
- Advertisement -