अहमदनगर महानगरपालिकेचा अजब कारभार – रामचंद्रखुंट ते चौपाटी कारंजा भुयारी गटार योजनेच्या पाईप फक्त दीड फूट व्यासाचा

0
97

अहमदनगर प्रतिनिधी – महेश कांबळे

नवनीतभाई बार्शीकर यांनी ३५ वर्षांपूर्वी त्यावेळच्या लोकसंख्येप्रमाणे ३ फुटाची ड्रेनेजलाइन टाकली होती आता नगर शहराची लोकसंख्या ४ लाख पर्यंत गेली आहे व सध्या रामचंद्रखुंट ते चौपाटीकारंजा भुयारी गटार योजनेच्या या ठिकाणी जी पाईपलाईन टाकली जात आहे.ती फक्त दीड फूट व्यासाची आहे,ती कमीत कमी ५ फुटाची टाकायला पाहिजे.कारण पुढील २० ते २५ वर्षाचे नियोजन केले पाहिजे असे मत चितळेरोड येथील व्यापारी शुभम झिंजे यांनी मांडले आहे.

आपली मनापा नक्की काय करते असा विचार सध्या नागरिकांना पडला आहे कारण चौपाटी कारंजा हे बाजारपेठेचे तोंड आहे तिथून पुढे चितळेरोड,नवीपेठ, तेलीखुंट,कापडबाजार या ठिकाणी जाता येते हा परिसर कायम गजबजले व लोकसंख्या मोठ्या संख्येने आहे.या कामासाठी नियुक्त केलेल्या ठेकेदार हा सकाळी ११ च्यापुढे काम करतो.

सध्या चौपाटी कारंजा इथून रोड बंद केला आहे व पाइप टाकण्याचे काम चालू आहे.त्यामुळे गेली ८ दिवस बाजारपेठ विस्कळीत झाले आहे, याकडे प्रशासनाचे अजिबात लक्ष नाही कोणी नगरसेवक, वाहतूक शाखा ही लक्ष द्यायला तयार नाही,इथे कुठेही पाटी लावली नाही किंवा ठेकेदाराचे माणसंही रस्ते बंद आहे म्हणून सांगायला बसलेले नाही,अगदी चौपाटी कारंजाला पोहचतो व तेथून त्याला परत चितळेरोड कडे यावे लागते म्हणून हे काम रात्रीचे करणे गरजेचे आहे.

विद्युत मंडळ,रिलायन्स केबल,उड्डाणपूल वाले ठेकेदार रात्रीचे काम करतात त्यामुळे या कामांचा नागरिकांना व व्यापाऱ्यांना अजिबात त्रास होत नाही.परंतु येथे अत्यंत धीम्या गतीने काम चालू आहे,महापालिकेतील अधिकारी आयुक्त-उपायुक्त यांची प्रशासनावर अजिबात पकड राहिली नाही व सर्व ढिसाळ कारभार चालू आहे.

ठेकेदार व प्रशासनाचे काय गौडबंगाल आहे कळत नाही म्हणून मी एक व्यापारी म्हणून माझी प्रशासनाला विनंती आहे की आपण चाललेले काम हे रात्री करावे व त्यामुळे व्यापाऱ्यांना दिवसा आपले व्यवसाय करता येतील व नागरिकांना जाण्या येण्याची सोय होईल व वाहतूक कोंडी होणार नाही.

यासंदर्भात चितळेरोड हातगाडी संघटनेचे अध्यक्ष संजय झिंजे व पदाधिकारी आयुक्त व महापौर यांची भेट घेऊन त्यांच्या कानावर ही गोष्ट घालून निवेदन देणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here