अहमदनगर रेल्वे स्थानकाला भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याची मागणी- चंद्रकांत पाटोळे.

- Advertisement -
अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर रेल्वे स्टेशन येथे अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत 508 रेल्वे स्टेशनचे पूर्ण विकास कार्यक्रमांतर्गत आलेले खासदार डॉ.सुजय विखे यांना भाजपाचे अनुसूचित जाती-जमातीचे शहर जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत पाटोळे च्या वतीने निवेदन देण्यात आले.
ऐतिहासिक अहमदनगर शहर असून अनेक वर्षांपासून रेल्वे विभागाने अविरतपणे सेवा सर्वसामान्यांना दिलेली आहे. इतिहास काळातील अनेक घटना स्वतंत्र सैनिक, समाज सुधारक यांच्या शहराशी व रेल्वे स्थानकाशी जवळचा संबंध आहे. अनेक इतिहासकालीन वास्तू महान संत या पावन भूमीत जन्मलेले आहेत म्हणून अहमदनगरच्या रेल्वे स्थानकाला भारताच्या घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याची मागणी निवेदनाद्वारे खासदार डॉ.सुजय विखे यांना करण्यात आली.यावेळी भाजपाचे अनुसूचित जाती जमातीचे शहर जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाटोळे समवेत कुसुमताई शेलार, श्याम वाघचौरे, संदेश रपारिया, राम सकट, मनोज मिसाळ, विनोद दुशिंग, श्याम साळवे, नितीन जगताप, दिनेश पाडळे, आकाश भिंगारदिवे, राजेंद्र सातपुते, राधेश भालेराव, अरविंद कांबळे, विलास गव्हाळे, रोहित लांडगे, रुपेश सोनवणे, भूषण दिवटे, शुभम कावळे, असलम शेख, अशोक भोसले, रोहन शेलार आधी सह पदाधिकारी उपस्थित होते.
पुढे निवेदनात म्हंटले आहे की, महाराष्ट्राचे रेल्वे एवम कोळसा खान मंत्री रावसाहेब दानवे यांची भेट घेऊन त्यांना देखील निवेदन देण्यात येणार असून अहमदनगर रेल्वे स्थानक पुनर्विकासामध्ये सर्वसामान्यांना जास्तीत जास्त सुविधा देण्याचा शासनाचा प्रयत्न असून दळणवळण सुविधा अद्यावत करून उद्योग व्यवहारासह प्रवास यंत्रणा सक्षम करण्याच्या उद्देश असून अहमदनगर शहरातील रेल्वे स्थानकाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याची मागणी भाजपा अनुसूचित जाती जमाती च्या वतीने करण्यात आली आहे.
- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -
- Advertisement -

Latest Articles

error: Content is protected !!