अहमदनगर प्रतिनिधी – येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात आज सकाळी साडेदहाच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत ११ रुग्णांचा मृत्यू झाल्या मुळे मला तीव्र दुःख झाले असून आजची घटना ही अत्यंत वेदनादायी आहे.अशा दु:खद भावना राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केल्या.त्यांनी आज सायंकाळी सामान्य रुग्णालयास भेट देऊन येथे घडलेल्या घटनेची माहिती घेतल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
रुग्णालयात सकाळी ही दुर्घटना घडल्यानंतर संपूर्ण हॉल मध्ये धुर पसरला होता.या धुरामुळे बचाव कार्यात अडथळा निर्माण झाला होता.त्यावेळेस येथे स्थानिक आमदार, संग्राम जगताप व त्यांचे सहकारी आणि प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी यांनी तत्परता दाखवत तात्काळ मदत कार्य सुरू केले व रुग्णांना बाहेर काढून दुसर्या जागी स्थलांतरीत केले.या घटनेची चौकशी करण्यासाठी विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समितीची नेमण्यात आली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
चौकशी समितीमध्ये हा प्रकार कशामुळे झाला आहे याचा अभ्यास करून,यात कोण कोण दोषी आहेत याची जबाबदारी निश्चित झाल्यावर दोषींवर तात्काळ कारवाई करण्यात येईल.सखोल चौकशी होईपर्यंत आत्ताच काही सांगणे योग्य होणार नाही.रुग्णालयाला लागलेल्या आगीमुळे रुग्णांचा ऑक्सिजन पुरवठा बंद झाला.
त्यामुळे काही रुग्ण दगावल्यचा प्राथमिक अंदाज आहे. तज्ञांकडून संपूर्ण अतिदक्षता विभागाची तपासणी करून ही घटना कशामुळे घडली आहे, याचे निष्कर्ष घ्यावे लागतील त्यानंतर दोषींवर कारवाई करण्यात येईल. असे त्यांनी सांगितले