नुकसान भरपाई देण्याचा प्रयत्न करु-महापौर रोहिणी शेंडगे
अहमदनगर प्रतिनिधी – चितळे रोड येथील दत्त बेकरीस आग लागून मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्या मशिनरीची पाहणी महापौर रोहिणी शेंडगे व शिवसेना शहरप्रमुख संभाजी कदम यांनी केली. याप्रसंगी नगरसेवक गणेश कवडे, सचिन शिंदे, शाम नळकांडे, संजय शेंडगे, संतोष गेनप्पा आदि उपस्थित होते.
याप्रसंगी महापौर रोहिणी शेंडगे म्हणाल्या, दत्त बेकरी येथे लागलेल्या आगीमुळे झालेले नुकसान हे दुर्दैवी आहे, अशा घटनांमुळे व्यवसायाबरोबरच कुटूंबावर मोठा परिणाम होत असतो. परदेशी कुटूंबियांच्या मागे आम्ही उभे राहून त्यांना आवश्यक ती मदत करुच. त्याचप्रमाणे ही आग कशामुळे लागली, याचीही चौकशी करण्यात येईल. यात वीजेचा प्रवाह वाढला होता का? आणखी काय याबाबत संयुक्तरित्या चौकशी करु. त्याचप्रमाणे शासनाकडून नुकसान भरपाई देण्याचा प्रयत्नही केला जाईल, असे आश्वासन महापौर रोहिणी शेंडगे यांनी दिले.
यावेळी संभाजी कदम म्हणाले, दत्त बेकरीने समस्त नगरकरांमध्ये आपल्या सेवेने मोठा नावलौकिक मिळविला आहे. त्यांच्या प्रामाणिक व तत्पर सेवामुळे ते प्रसिद्ध आहेत. अशा दत्त बेकरीला आग लागल्याने मोठे नुकसान झाले आहे, अशा कठिण परिस्थिती परदेशी कुटूंबियांना आधार देऊन त्यांना सर्वोतोपरि मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. या घटनेने थर्डी पार्टीमार्फत ऑडीट करण्यासाठी प्रयत्न करु. तसेच अशा घटना पुन्हा घडू नये यासाठी चौकशी करुन त्यावर संबंधित विभागांना उपययोजना करण्यास सांगू. असे सांगितले.
यावेळी दत्त बेकरीचे संचालक सुधीर परदेशी यांनी आग लागेल्यानंतर झालेल्या मशिनरी व नुकसान झालेल्या मालाबाबत माहिती दिली. त्याचप्रमाणे मालत्तेचे नुकसान झाले असले तरी मनुष्य हानी झाली नाही ही मोठी गोष्ट आहे.आज महापौर व शिवसेना पदाधिकार्यांनी भेट देऊन आम्हाला जो आधार दिला आहे, त्यातून आम्हास सावरण्याचे बळ मिळणार असून, सर्वांच्या सहकार्याने पुन्हा नव्या जोमाने नगरकरांच्या सेवेत रुजू राहू, असा विश्वास व्यक्त केला.
- Advertisement -