आचार्य श्री महाश्रमणजी यांच्या अहिंसा यात्रेचे कडा येथे अमोलक मध्ये होणार आगमन.

आचार्य श्री महाश्रमणजी यांच्या अहिंसा यात्रेचे कडा येथे अमोलक मध्ये होणार आगमन.

आष्टी / कडा प्रतिनिधी – जैन श्वेतांबर तेरापंथ धर्म संप्रदायाचे अकरावे आचार्य युगप्रधान श्री महाश्रमाणजी यांच्या अहिंसा यात्रेचे आगमन गुरुवार दिनांक १८ एप्रिल २०२४ रोजी श्री अमोलक जैन विद्या प्रसारक मंडळ कडा येथे होत आहे. श्री अमोलक जैन विद्या प्रसारक मंडळाच्या वतीने दिवसभर अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. हे कार्यक्रम सर्व धर्मीयांसाठी खुले ठेवण्यात आले आहेत, अशी माहिती श्री अमोलक जैन विद्या प्रसारक मंडळ तसेच श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ यांच्यावतीने देण्यात आलेली आहे.
आपल्या कड्यासारख्या ग्रामीण भागात प्रथमच युगप्रधान आचार्य श्री महाश्रमणजी यांच्या अहिंसा यात्रेचे आगमन होत आहे. त्यांच्यासोबत १०० साधू-साध्वी असून कडा आणि कडा परिसरातील नागरिकांना इतक्या मोठ्या संख्येने साधु-साधविंच्या दर्शनाचा लाभ मिळणार असल्याने त्यांच्या दिव्य दर्शनासह अनमोल मार्गदर्शनासाठीची विशेष व्यवस्था करण्यात आलेली आहे.
आचार्य श्री महाश्रमणजी हे आत्मकल्याणासह, लोककल्याण आणि परोपकार यावर विशेष भर देत असून, अहिंसा यात्रेच्या माध्यमातून नैतिकता, प्रामाणिकता, अहिंसा, सदाचार आणि नशामुक्तीची प्रेरणा देऊन जनमानसात नवा उत्साह निर्माण करतात.
श्री अमोलक जैन विद्या प्रसारक मंडळ ही संस्था परमपूज्य श्री अमोलक ऋषीजी महाराज साब यांच्या शुभहस्ते सन १९२४ मध्ये सुरू करण्यात आलेली असून, ही संस्था आपले शतक महोत्सवी वर्ष साजरे करत असतानाच १०० साधू-साधवींचे आगमन या संस्थेमध्ये होत असल्याने हा या संस्थेसाठी दुग्धशर्करा योग असल्याचे संस्था पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
सकाळी ९:३० वाजता युगप्रधान आचार्य श्री महाश्रमणजींच्या अमृतवाणीतून दिव्य प्रवचनाचा सोहळा सुरू होईल. दुपारी १ ते २ दरम्यान सर्व धर्मीयांसाठी दर्शनाचा विशेष सोहळा आयोजित करण्यात आलेला असून इतर विविध विषयांवर मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. त्यानंतर रात्री ८ ते ८:३० या वेळेत आचार्य श्री महाश्रमणजी यांच्या चरणस्पर्शाचा विशेष सोहळा संपन्न होईल.
कड्यासारख्या ग्रामीण भागामध्ये प्रथमच येत असलेल्या युग प्रधान आचार्य श्री महाश्रमणजी यांच्या स्वागतापासून दिवसभरातील सर्व कार्यक्रमांचा कडा आणि परिसरातील जिज्ञासू भाविकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा असे आवाहन श्री अमोलक जैन विद्या प्रसारक मंडळ आणि श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ यांच्या वतीने करण्यात आलेले आहे.
- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles

error: Content is protected !!