आजी-आजोबा झालेले माजी विद्यार्थी 42 वर्षांनंतर आले एकत्र

0
214

आजी-आजोबा झालेले माजी विद्यार्थी 42 वर्षांनंतर आले एकत्र

शालेय जीवनातील आठवणींना दिला उजाळा

 

अहमदनगर (प्रतिनिधी)- शेंडी (ता. नगर) येथील न्यू इंग्लिश स्कूलचे 1980-81 च्या दहावीच्या बॅचचे माजी विद्यार्थी तब्बल 42 वर्षांनंतर एकत्र आले. आजी-आजोबा झालेले माजी विद्यार्थी एवढ्या वर्षानंतर एकत्र आल्याने आपल्या जुन्या मित्र-मैत्रिणींना ओळखणेही अवघड झाले झाले होते.

सर्व माजी विद्यार्थी एकत्र येऊन आपल्या शालेय जीवनाच्या जुन्या आठवणीत रममाण झाले होते. प्रत्येकजण आपली शाळा कशी होती?, वर्गात कुठल्या विद्यार्थ्यांमध्ये कुठले गुण होते? शालेय जीवनात केलेली धमाल, गंमत-जंमत केलेल्या गोष्टींची चर्चा रंगली होती. बालपणीचे वर्ग मित्र भेटल्याचा आनंद सर्वांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता.

साई मुरली कार्यालयात झालेल्या या स्नेह मेळाव्याप्रसंगी उपस्थित असलेले शिक्षक बापुराव वाळुंज, माधव जगदाळे, वांढेकर सर, सिताराम तोडमल यांचा माजी विद्यार्थ्यांनी सत्कार केला. आपल्या लाडक्या शिक्षकांशी देखील विद्यार्थ्यांनी मनमुराद गप्पा मारुन जुन्या आठवणी सांगितल्या.या सर्व मित्र-मैत्रिणींना एकत्र आणण्याचे नियोजन व आयोजन विजय प्रभुणे, अंबादास भगत, गोविंद वाघ यांनी केले होते. यावेळी शोभा देशपांडे, शोभा राऊत, उषा पुंड, बेबी लोळगे, लक्ष्मण भगत, पोपट खरमाळे, शेख पिरमोहम्मद आदी माजी विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here