आज हुतात्मा स्मारकात लखीमपूर हिंसाचाराच्या निषेधार्थ आंदोलन

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांना नथुराम-डायर मंत्री घोषित करणार

तर मंत्रीच्या प्रतिकात्मक पुतळा झाडाला उलटा बांधून मिरचीची धुणी देणार  

अहमदनगर प्रतिनिधी – वाजिद शेख

उत्तर प्रदेशमधील लखीमपूरमध्ये शेतकर्‍यांना मोटारीखाली चिरडल्याच्या घटनेच्या निषेधार्थ शहरातील हुतात्मा स्मारक येथे आज रविवारी (10 ऑक्टोबर) सकाळी 11 वाजता पीपल्स हेल्पलाईन, भारतीय जनसंसद व मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाच्या वतीने भाजपचे केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांना नथुराम-डायर मंत्री घोषित केले जाणार आहे.

तर त्यांच्या प्रतिकात्मक पुतळा झाडाला उलटा बांधून मिरचीची धुणी दिली जाणार असल्याची माहिती संघटनेचे निमंत्रक अ‍ॅड.कारभारी गवळी यांनी दिली.

लखीमपूरमध्ये शेतकर्‍यांना गाडीने चिरडण्याची व गोळीबाराची घटना घडली.जालियनवाला बागप्रमाणे परिस्थिती उद्भवली.यामध्ये आठ आंदोलक शेतकरी हुतात्मा झाले. या घटनेचा मुख्य आरोपी आशिष मिश्रा हा भाजपचे केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांचा पुत्र आहे. मंत्रीपुत्राने हा हिंसाचार केला असून,स्वातंत्राच्या अमृतमहोत्सवी वर्षात भाजप सरकार नथुराम गोडसे व जनरल डायर प्रवृत्ती पोसत असल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे.

शहरातील हुतात्मा स्मारक येथे रविवारी लखीमपूरमध्ये हुतात्मा झालेल्या शेतकर्‍यांना श्रध्दांजली वाहून हे आंदोलन केले जाणार आहे.

या आंदोलनासाठी अ‍ॅड. गवळी, अशोक सब्बन, कॉ. बाबा आरगडे, वीरबहादूर प्रजापती, ज्ञानदेव काळे, सुधीर भद्रे, शाहीर कान्हू सुंबे, बाळासाहेब गायकवाड, विठ्ठल सुरम आदी प्रयत्नशील आहेत.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -
- Advertisement -

Latest Articles

error: Content is protected !!