आज १०४७ रूग्णांना डिस्चार्ज तर नव्या ८४६ बाधितांची रुग्ण संख्येत भर

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

 

अहमदनगर:

जिल्ह्यात आज १०४७ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ९२ हजार ९२४ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.०३ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ८४६ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ५ हजार ८०४ इतकी झाली आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये १८६, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ३४० आणि अँटीजेन चाचणीत ३२० रुग्ण बाधीत आढळले.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा १३, जामखेड १३, कर्जत ०१, नगर ग्रा. २३, पारनेर ७४, पाथर्डी २०, राहता ०१, राहुरी ०१, संगमनेर १०, श्रीगोंदा २४ आणि इतर जिल्हा ०६ अशा रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा १३, अकोले १०, जामखेड ०१, कर्जत २४, कोपरगाव २४, नगर ग्रा.४०, नेवासा ०८, पारनेर ०७, पाथर्डी ०२, राहता १२, राहुरी २३, संगमनेर ७०, शेवगाव ८२, श्रीगोंदा ०४, श्रीरामपूर १६ आणि इतर जिल्हा ०४ अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत आज ३२० जण बाधित आढळुन आले. मनपा ०३, अकोले २८, जामखेड ०८, कर्जत ४३, कोपरगाव ०५, नगर ग्रा. १४, नेवासा ३२, पारनेर ५१, पाथर्डी ०६, राहता १७, राहुरी १७, संगमनेर २६, शेवगाव ३८, श्रीगोंदा २०, श्रीरामपूर ११ आणि इतर जिल्हा ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा २२, अकोले ५६, जामखेड ९१, कर्जत १२५, कोपरगाव ३१, नगर ग्रा. ५३, नेवासा ३८, पारनेर १३७, पाथर्डी ३८, राहता ३५, राहुरी ३६, संगमनेर १५३, शेवगाव १३२, श्रीगोंदा ४९, श्रीरामपूर ३२, कॅंटोन्मेंट बोर्ड ०२ आणि इतर जिल्हा १७ अशा रुग्णांचा समावेश आहे.

बरे झालेली रुग्ण संख्या:२,९२,९२४

उपचार सुरू असलेले रूग्ण:५८०४

पोर्टलवरील मृत्यू नोंद:६२९७

एकूण रूग्ण संख्या:३,०५,०२५

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -
- Advertisement -

Latest Articles

error: Content is protected !!