आठरे पाटील मेमोरियल हॉस्पिटल वर दरोडा टाकणारे गणेश फसले व त्याच्या गुंडांना तातडीनेअटक करून दरोडाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

आठरे पाटील मेमोरियल हॉस्पिटल वर दरोडा टाकणारे गणेश फसले व त्याच्या गुंडांना तातडीने अटक करून दरोडाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

अहमदनगर (प्रतिनिधी)- आठरे पाटील मेमोरियल हॉस्पिटलच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये हॉस्पिटलचे अनिल आठरे पाटील म्हणाले की, अहमदनगर शहरातील नगर मनमाड रोडवरील झोपडी कॅन्टीन येथे ९ जून २०२४ रोजी आठरे पाटील मेमोरियल हॉस्पिटलमध्ये गणेश सर्जेराव फसले यांनी सायंकाळी ६.३० वाजता येऊन आठरे पाटील मेमोरियल हॉस्पिटल वर कब्जा करण्याचा प्रयत्न केला तो आणि त्याचे ३० ते ४० गुंड सोबत आले होते.

हॉस्पिटलमध्ये जबरदस्ती करून प्रवेश केला व त्या सर्वांनी हॉस्पिटल मधील आयसीयू, ऑपरेशन थिएटर, अंतर रुग्ण विभाग, लॅबोरेटरी, संगणक कक्ष व इतर भागातील कुलूपे तोडून कॉटस, मॉनिटर्स, ए.सी युनिट, व्हेंटिलेटर, फर्निचर व इलेक्ट्रॉनिक वस्तूची नासधूस केली व त्याचबरोबरच तोडफोड करून डॉ. अनिल आठरे पाटील यांच्या कुटुंबावर हल्ला केला आणि अब्रू नुकसानी कारक कृत्य केले या सर्व घटने दरम्यान डॉ. अनिल आठरे पाटील काही कामानिमित्त बाहेर बाहेर गेले होते. दवाखान्यात त्यांच्या पत्नी डॉ.अंजली आठरे व मुलगी डॉ. आदिती आठरे हे हॉस्पिटल मध्ये उपस्थित होत्या त्यांनी हॉस्पिटल मधील सर्व प्रकार थांबवण्याचा प्रयत्न केला तसेच मुलगी डॉ अदिती आठरे यांना प्रतिकार करत असताना गणेश फसले व त्याच्या गुंडांनी गरडा घालून तिला जोराने बाजूला लोटले व डॉ. अंजली आठरे यांना ही जोराचा धक्का देऊन बाजूला काढले त्यामुळे त्यांच्या पायाच्या गुडघ्याला इजा झाली.

डॉ. अनिल आठरे पाटील हे हॉस्पिटलमध्ये पोहोचले तेव्हा त्यांनी ट्रक क्रमांक एम एच १२ इ एफ ५६६८ हा हॉस्पिटल मधील साहित्यांनी भरून बाहेर पाठविला होता. त्यावेळी मी सर्व प्रकार थांबवण्याचा प्रयत्न केला तेव्हा गणेश सर्जेराव फसले आणि त्याचे गुंड यांनी आम्हाला अत्यंत तुच्छ भाषेत शिव्या व जिव्या मारण्याची धमकी दिली व अपमानित करून माझ्या वर हल्ला केला त्यानंतर जवळचे पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाल्यावर त्यांनी आठरे पाटील हॉस्पिटल मधील साहित्याचे भरलेले दोन ट्रक जप्त केले आणि तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये रात्रभर पावसात ठेवले या मौल्यवान वस्तूही उघड्यावरच पावसात होत्या त्यापैकी वस्तूंनी भरलेली पहिली ट्रक अद्याप पर्यंत मिळालेली नाही त्याच रात्री पोलिसांनी या सर्व घटनेचा गुन्हा दाखल करून घेतला.

तसेच वस्तूची उन्हामुळे किंवा पावसामुळे काही नुकसान होऊ नये म्हणून त्या वस्तू ताबडतोब आम्हाला मिळण्याची विनंती केली परंतु गणेश सर्जेराव फसले यांनी केलेले हे बेकायदेशीर कृत्य असून ते वारंवार त्रास देत आहे हा प्रसंग अत्यंत अन्यायकारक व हानिकारक होता फसले यांनी आठरे पाटील मेमोरियल हॉस्पिटलची इमारत व त्यामधील साहित्य माझ्याकडून भाडेतत्त्वावर ५ वर्षाच्याचा करार करून घेतला होता व त्यांचे २०२५ पर्यंत करार झालेला होता.

ठरल्याप्रमाणे रक्कम अदा करण्यात आली होती परंतु २०१९ कोविडच्या वेळी हॉस्पिटल ला खूप फायदा झाला परंतु कोविड नंतर फसले व त्यांच्या भागीदारांमध्ये हिशोबावरून आपसात भांडण होऊन हॉस्पिटल बंद पडले त्यानंतर फसले यांनी हॉस्पिटल चालू असताना एग्रीमेंट मध्ये ठरवल्याप्रमाणे सरकारी कर टी.डी.एस, विद्युत बिल, हॉस्पिटलचे भाडे, हॉस्पिटलचा मेंटेनेस पैसे इत्यादी भरणे बंधन केले त्यांच्याकडून वरील तिन्ही एग्रीमेंट चे उल्लंघन झाले तर यानंतर काही देणे बाकी असल्यास हॉस्पिटलचा सर्व खर्च ५ वर्षाचा ठरलेला मोबदला बंधनकारक आहे व तो न भरल्यास ही रक्कम हॉस्पिटलचे साहित्य जप्त करून त्यामधून वसूल केली जाईल असे ठरले होते परंतु सन २०२२ मध्ये फसले याने स्वतः वकिलामार्फत मला नोटीस पाठवून सांगितले की हॉस्पिटल चालवण्याची क्षमता नाही व तो हॉस्पिटल बंद करून हॉस्पिटलचा ताबा देत आहे. त्यांनी या नोटीस मध्ये डिपॉझिट व इतर साहित्य परत देण्याबाबत काहीही लिहिलेले नव्हते तसेच हॉस्पिटलचा ताबा देण्यापूर्वीचे काहीही महिन्याची ठरवलेली रक्कम ही दिलेली नव्हती यावेळेस त्याने विनंती केली होती म्हणून त्याला रक्कम देण्याच्या वेळेमध्ये सवलत दिली हॉस्पिटलचा ताबा देण्याच्या वेळेस ठरलेली थकीत रक्कम ही डिपॉझिट मधून कमी केली व त्यानंतरही उरलेल्या थकीत रकमेचा धनादेश दिला व तो धनादेश वाटला न गेल्यामुळे आम्ही फसले च्या विरुद्ध निगोसेबल अँक्ट सेक्शन १३८ प्रमाणे कोर्टात क्रिमिनल केस दाखल केली व सदरील केस सुद्धा कोर्टात अद्यापर्यंत चालू आहे. यापूर्वी अचानक एप्रिल २०२४ ला गणेश फसले व त्याचे गुंड ३० ते ३५ घेऊन हॉस्पिटलला ताबा घेण्यासाठी उपस्थित झाले व त्याने दावा केला की हॉस्पिटल हे माझ्या ताब्यात आहे व तो आणि त्याचे गुंड १० दिवस हॉस्पिटलमध्ये तळ ठोकून बसले होते.

त्यावेळीही त्यांनी १० दिवस खाजगी मालमत्तेत अतिक्रमण करून प्रॉपर्टीची तोडफोड करून नुकसान केले गणेश फसले व गुंडांवर एफ आय आर केली व त्यांच्या सर्व गुंडांना १० दिवसानंतर हॉस्पिटलच्या आवारातून बाहेर काढण्यात यश आले. त्यानंतर सर्व काही सुरळीत चालले असताना ९ जून २०२४ रोजी परत तेच ३० ते ४० गुंड घेऊन गणेश सर्जेराव फसले हे हॉस्पिटलमध्ये आले आणि हॉस्पिटल मधील साहित्याची चोरी करून माझ्या परिवारावर हल्ला केला फसले आणि त्याच्या गुंडांकडून वारंवार होणाऱ्या हिंसक कृत्याद्वारे आठरे पाटील परिवाराला आणि हॉस्पिटलच्या स्टाफला अत्यंत धोका निर्माण झाला आहे त्याचे हे कृत्य असेच चालू राहिले .तर आमच्या परिवाराच्या जीवितास धोका आहे संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गणेश सर्जेराव फसले यां गुंडांवर योग्य ती कडक कारवाई करावी व लवकरात लवकर गुंडांना अटक करून कारवाई करण्याची मागणी पत्रकार परिषदेमध्ये आठरे पाटील मेमोरियल हॉस्पिटलचे डॉ अनिल पाटील, अंजली आठरे, अदिती आठरे, मानसिंग आठरे आदी उपस्थित होते.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -
- Advertisement -

Latest Articles

error: Content is protected !!