आढळगावं चे उच्चशिक्षित युवक सुभान तांबोळी पंचायत समिती निवडणूकीत आढळगावं गणातून आपले नशीब आजमावणार ?

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

आढळगाव प्रतिनिधी – सुभान तांबोळी यांना आढळगाव गणा मध्ये त्यांना मानणारा खुप मोठा युवक वर्ग आहे.त्याच्या जवळ तालुक्यात युकवकांचे मोठे संघटन आहे.कोरोणाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत लोक आपला जीव मुठीत घेउन जगत होते त्या वेळेस त्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता सामजिक बांधिलकी जपत व गरीब लोकांना हॉस्पिटलचा भला मोठा खर्च पेलवणारा नाही ही बाब लक्षात घेऊन त्यांनी आढळगावं मध्ये कोविड सेंटर चालु केले व त्या माध्यमातून आढळगावं, घोडेगाव, भाऊडी, कोकणगावं, घुगलवडगाव, तांदली, देवळगावं ई. पंचक्रोशीतील गावातील शेकडो गरीब लोकांचे जीव वाचवण्याचे मोठे कार्य त्यानी कोरोनाच्या कालावधी मध्ये केले आहे.त्याच बरोबर रात्री अप रात्री खेडे पाड्यातील गावात येणाऱ्या पेशंट ची मद्दत करण्याची त्याची ख्याती प्रसिद्ध आहे.

तसेच त्यांनी कोरोना कालावधी मध्ये स्वतःच्या स्वखर्चाने ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेट आणले व ज्यांना कुणाला ऑक्सिजनची गरज भासेल त्यांना मोफत घर पोहाच ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेट देण्याचे महत्वाचे काम केले आहे.त्यांच्या सामाजिक व सार्वजनिक कामाची दखल घेऊन त्यांना विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

त्याचे राष्ट्रीय व प्रादेशिक पातळी वरील राजकीय नेत्यांशी असलेली जवळीक व आपुलकीचे संबंध आहेत.पारनेर चे राष्ट्रवादी चे आमदार निलेश लंके याचे विश्वासू आहेत.तसेच त्यांनी केलेल्या सामजिक कामाच्या आधारावर ते पण या निवडणुकीत उतरण्याचे दाट शक्यता नाकारता येत नाही.त्याच्या मुळे इतर उमेदवारांची गोची होणार हे नक्की याच्या मुळे पक्षाला श्रीगोंदा तालुक्यातून एक मुस्लीम बहुजन युवक चेहरा भेटू शकतो.येत्या विधानसभेत मुस्लिम अल्पसंख्याक समजाच्या मतांची गोळा बेरीज करण्या साठी त्यांना तालुक्यांतील राजकारणात प्रतिनिधित्व करण्याची संधी देणे तितकेच गरजेचे आहे.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -
- Advertisement -

Latest Articles

error: Content is protected !!