दोन लाख पंचावन्न हजार तीनशे एक रुपयाची पंडीत जवाहरलाल नेहरु विद्यालयाला मदत.
आढळगावं प्रतिनिधी – कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत आढळगावं मध्ये पंडीत जवरलाल नेहरू विद्यालय मध्ये कोविड सेंटर चालु करण्यात आहे होते. त्या मध्ये आढळगावं व पांच्रोशितील नागरिकांचा मोफत उपचार करण्यात आला त्या मध्ये जवळ पास ५५० ते ६०० रूग्णांना उपचार देण्यात आले होते. त्या सेंटर साठी गावातील लोकांनी भरघरून मदत केली.
कोणी रोख स्वरूपात, कोणी मेडेसिन, तर कोणी धान्याच्या स्वरूपात भरभरून मदत केली.जेवढी मदत मिळाली त्याच्या मधून सेंटर साठी खर्च वजा करता. सेंटर कडे 2,55,301( दोन लाख पंचावन्न हजार तीनशे एक रुपया ) जमा शिल्लक राहिलेली रक्कम ही सेंटर चे संचालक मंडळ अमोल गव्हाणे, शरद जमदाडे, सुभान तांबोळी, दिनकर पंडीत, मनोज ठवाल, बाळू शिंदे, देवराव वाकडे ,माऊली उबाळे यांच्या निर्णयाने पंडीत जवाहरलाल नेहरू विद्यालय मध्ये नवीन अकरावी व बारावी विज्ञान शाखेत प्रयोग शाळे साठी सरपंच बंटी उबाळे,जिजाराम डोके, देवराव शिंदे ,दगडु शिंदे , राजाराम काळे यांच्या हस्ते शालेय समिति चे अध्यक्ष बापू शेठ गांधी व शाळेचे शिक्षक यांच्या कडे ही मदत देण्यात आली.
त्याच प्रमाणे सेंटर चे साहित्य खाट गादी हे सिद्धेश्वर मंदिर साठी देण्यात आल्या अशी महिती सुभान तांबोळी यांनी दिली. त्या वेळी कोविड सेंटर साठी ज्यांनी कोणी प्रतेक्ष्य अप्रतेक्ष्य रित्या मदत करून आमच्यावर विश्वास दाखवला. अश्या थोर देणगी दारांचे सेंटर चे संचालक सुभान तांबोळी यांनी मणा पासून आभार मानले. व पुढील काळात आपल्या गावावर काही संकट आले तर अशाच पद्धतीत आम्हीं सगळे राजकरण बाजूला ठेऊन युवक वर्ग उभा राहू असा विश्वास दर्शवला.