आता एटीएम कार्डधारकांना देखील विमा संरक्षण

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

कर्जत युनियन बँकेने दिला मृताच्या नातेवाईकांना दोन लाख रुपयांचा विमा;कर्जत तालुक्यातील पहिलीच घटना..

कर्जत प्रतिनिधी – गणेश जेवरे

आता एटीएम कार्डधारकांना देखील विमा संरक्षण;कर्जत युनियन बँकेने दिला मृताच्या नातेवाईकांना दोन लाख रुपयांचा विमा;कर्जत तालुक्यातील पहिलीच घटना..

आज प्रत्येक मानवाचे जीवन अतिशय धावपळीचे आणि असुरक्षित आहे कोणतीही दुर्घटना कधी घडेल काही सांगू शकत नाही असे असताना त्याला विमा कवच घेण्यासाठी प्रत्येक जण हजारो रुपये मोजत असतो परंतु आपण घेतलेले बँकेच्या एटीएम कार्ड आणि त्याला देखील विमा कवच असल्याची माहिती अनेकांना नाही एटीएम कार्ड वापरत असाल तर आता बँकेकडून विमा कवचे मिळते आणि या कार्डधारकाला दुर्दैवी मृत्यू आल्यास सहा लाख रुपये पर्यंत विमा नातेवाईकांना दिला जात आहे मात्र याची माहिती अनेकांना नाही कर्जत येथील युनियन बँकेने मात्र त्यांच्या अशाच ग्राहकाचा मृत्यू झाल्यावर त्याला दोन लाख रुपयांची मदत केली आहे.

कर्जत युनियन बँकेचे खातेदार श्रीरंग जयवंत थोरात यांचे अपघाती निधन झाले होते.ते युनियन बँक शाखा कर्जतचे एटीएमधारक असल्याने त्यांना विमा कवच प्राप्त झाले होते त्यांना बँकेच्यावतीने दोन लाख रुपयांचा धनादेश कर्जतचे तहसीलदार नानासाहेब आगळे यांच्या हस्ते वारसदार भाऊसाहेब श्रीरंग थोरात यांना प्रदान करण्यात आला.यावेळी युनियन बँकेचे अहमदनगर क्षेत्रीय अधिकारी सर्वेशकुमार, शाखाधिकारी दत्तात्रय लोंढे, कृषी अधिकारी रोहित कांचन, पत्रकार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष गणेश जेवरे, पत्रकार डॉ अफरोजखान पठाण उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलताना तहसीलदार आगळे म्हणाले की, युनियन बँकेच्या प्रत्येक खातेदाराने आपला अपघाती विमा योजना उतरविणे आवश्यक आहे.अत्यंत अल्प रकमेत सदर विमा योजनेचा लाभ खातेदार घेऊ शकतात. मृत्यु ही अटळ घटना असून संबंधित खातेदाराने जर आपला बँकेच्या माध्यमातून विमा घेतलेला असेल तर त्यांच्या पश्चात कुटुंबियासाठी ही विमा रक्कम मोठी आधार बनू शकते. त्यामुळे प्रत्येकाने विहित अल्प रक्कम बँकेच्या खात्यातून संबंधित बँकेत भरत या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन केले.

युनियन बँकेच्या माध्यमातून अल्प दरात खातेदारास विमा योजना उपलब्ध – शाखाधिकारी लोंढे

कर्जत शाखा युनियन बँकेच्या माध्यमातून प्रत्येक खातेदारास प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना ३३० रुपयांत दोन लाख रुपयांचा विमा उपलब्ध आहे. यासह प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेत अवघ्या १२ रुपयांत दोन लाख रुपये वारसास मिळते.जर तो खातेदार एटीएम धारक असेल आणि त्या व्यक्तीने मृत्युपूर्वी ९० दिवस अगोदर एटीमचा वापर करीत रक्कम खात्यातून काढली असेल तर त्यास देखील दोन लाख रुपयांचा विमा देण्यात येतो. त्यामुळे प्रत्येक खातेदाराने वरील सर्व विमा योजनेचा लाभ व त्यांची सविस्तर माहिती घ्यावी असे आवाहन शाखाधिकारी दत्तात्रय लोंढे यांनी केले आहे.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -
- Advertisement -

Latest Articles

error: Content is protected !!