आदिवासी दलित भटके विमुक्तांसाठी १४ जूनला संविधान सन्मान परिषद भव्य प्रबोधन मेळाव्याचे आयोजन
सावित्रीबाई फुले संविधान गट व संजीवनी संविधान गटाचा उपक्रम
अहमदनगर (प्रतिनिधी)- सावित्रीबाई फुले संविधान गट व संजीवनी संविधान गटाच्या वतीने १४ जून २०२४ रोजी सकाळी १० वाजता बेलवंडी ता.श्रीगोंदा येथील दलित वस्ती समाज मंदिर येथे संविधान सन्मान परिषद भव्य प्रबोधन मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे.
या मेळाव्यात कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ, खासदार निलेश लंके, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या उपस्थितीत कार्यक्रम होणार असून प्रमुख पाहुणे प्रणितीताई जगताप, जि प माजी अध्यक्ष अण्णासाहेब शेलार, श्रीगोंदा नगराध्यक्ष मनोहर पोटे, आदिवासी पारधी संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र काळे, श्रीगोंदा तहसीलदार सौ क्षितिजा वाघमारे, कर्जत डि वाय एस.पी.विवेकानंद वाखारे, सहाय्यक प्रकल्प अधिकारी राम जगताप, संविधान प्रचारक प्रशांत चव्हाण सर, गटविकास अधिकारी श्रीगोंदा राणीताई फराटे, बेलवंडी पोलीस निरीक्षक संतोष भंडारे, सामाजिक कार्यकर्ते सुनील ओव्हळ, बेलवंडी बुद्रुक चे सरपंच ऋषिकेश शेलार, संग्राम पवार, तालुका कृषी अधिकारी दीपक सुपेकर, प्रकल्प अधिकारी राजुर राजन पाटील, आदिवासी पारधी संघटनेचे चेअरमन राहुल भोसले हे उपस्थित राहणार असून जास्तीत जास्त आदिवासी दलित पारधी भटके विमुक्त समाजातील नागरिकांनी उपस्थित राहण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजक आदिवासी पारधी समाज संघटनेचे जिल्हा अध्यक्ष अजित भोसले यांनी आव्हान केले आहे.