आधुनिक पद्धतीने रेल्वे स्टेशन, एअर पोर्ट आणि लॉजिस्टिक्स पार्क डिझाईन केल्यास शहर विकासाला चालना शक्य – आर्की. प्रशांत देशमुख  

आर्किटेक्टस् इंजिनीअर्स अँड सर्व्हेअर्स असो.च्या सभासदांसाठी इनोव्हेशन इन इंफ्रास्ट्रक्चर फॉर कन्स्ट्र्क्शन इंडस्ट्री – एअर पोर्ट, रेल्वे स्टेशन अँड लॉजिस्टिक्स पार्क्स या विषयावर व्याख्यान संपन्न

आधुनिक पद्धतीने रेल्वे स्टेशन, एअर पोर्ट आणि लॉजिस्टिक्स पार्क डिझाईन केल्यास शहर विकासाला चालना शक्य – आर्की. प्रशांत देशमुख  

नगर : आर्किटेक्टस् इंजिनीअर्स अँड सर्व्हेअर्स असो. अहमदनगर आणि एस आर जे स्टील जालना यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यातील प्रतीथ यश आर्कीटेक्ट प्रशांत देशमुख यांचे इनोव्हेशन इन इंफ्रास्ट्रक्चर फॉर कन्स्ट्र्क्शन इंडस्ट्री – एअर पोर्ट, रेल्वे स्टेशन अँड लॉजिस्टिक्स पार्क्स या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी बोलताना प्रशांत देशमुख यांनी काळानुरूप रेल्वे स्टेशन, एअर पोर्ट डिझाईन व सुख सुविधामध्ये बदल गरजेचे असून पर्यटन आणि शहर विकासात त्यांचा महत्त्वाचा भाग आहे. यांचा योग्य प्रकारे विकास केल्यास शहर वासियांच्या मानसिकतेत नक्कीच बदल होईल. कुर्दुवाडी, हिंगणघाट, देहू रोड, आमला, सेवाग्राम, घोडा डोंगरी येथील रेल्वे स्टेशन चे डिझाईन सादरीकरण केले. तसेच बारामती चिंचवड, आकुर्डी, तळेगाव, केडगाव येथील री डेव्हलमेंट साठी असलेले डिझाईन सादर केले. रेवा एअर पोर्ट, कोईमतूर एअर पोर्ट यासाठी त्यांनी केलेल्या डिझाईन बाबत माहिती दिली.
कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये एस आर जे स्टील कंपनीचे अनिरुध्द पांडे, अविनाश पुरोहित, विशाल येसेकर आणि कंपनीचे सहकारी यांनी पुढाकार घेतला. यावेळी बोलताना संस्था अध्यक्ष रमेश कार्ले यांनी प्रशांत देशमुख यांचे मुंबई,पुणे, अहमदाबाद, चेन्नई, दमन येथे आफिसेस असून भारतच नाही तर श्रीलंका , इंडोनेशिया, अल्जेरिया, मध्य पूर्व देश हे त्यांचे कार्यक्षेत्र असून त्यांना आय सी आय बिर्ला अवॉर्ड, एसा पुणे बेस्ट स्ट्रक्चर अवॉर्ड , इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर फेलोशिप असे विविध पुरस्कार मिळाले असून आधुनिक भारताच्या निर्मितीत त्यांचा सिंहाचा वाटा आहे. एस आर जे स्टील कंपनीचे अविनाश पुरोहित यांनी राष्ट्रीय लेव्हल चे वक्ते एसा सभासदांना मार्गदर्शन करत असताना शहर विकासात नक्कीच त्याचा उपयोग आपले आर्किटेक्ट इंजिनीअर्स करतील असे नमूद करून अश्या व्यक्तींचे मार्गदर्शन व्याख्यान आयोजित करण्यात आमची स्टील कंपनी नेहमीच संस्थेला सहकार्य करत असते.
एस आर जे स्टील हा बांधकाम क्षेत्रात प्रमुख स्टील वितरक असून महाराष्ट्रासह विविध राज्यात स्टील देण्यास अग्रस्थानी आहे. तंत्रज्ञान, गुणवत्ता आणि उत्तम ग्राहक सेवा वितरकांचे जाळे यामुळे अती अल्प कालावधीत ग्राहकांच्या पसंतीस उतरली आहे. यावेळी मयुरेश देशमुख, संजय चांडवले, सय्यद इक्बाल, विजय पादिर, अभिषेक कार्ले, नंदकिशोर घोडके, वैभव देशमुख, उदय तरवडे आणि संस्थेचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. सचिव प्रदिप तांदळे यांनी सूत्र संचालन केले तर यश शहा यांनी उपस्थितांचे आभार मानले.
- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles